मनोरंजन

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांची 42 दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंझ अखेर अपयशी ठरली आहे. आज (ता. 21 सप्टेंबर) नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांना दीड महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तात्कळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याचवेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून आणि त्यांच्या मित्रांकडून वारंवार सांगण्यात येत होते. परंतु आज राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक संघर्ष केला. राजू श्रीवास्तव यांच्या विनोदांनी लोकांना पोट धरून हसायला लावले. ज्यामुळे ते लोकांच्या गळ्यातील ताईत सुद्धा बनले होते. राजू श्रीवास्तव यांनी स्टँडअप कॉमेडीच्या रिऍलिटी शो मध्ये येण्याआधीच आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळख असलेल्या सलमान खान याच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

परंतु राजू श्रीवास्तव यांना 2005 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून खरी ओळख मिळाली. या शो मध्ये राजू श्रीवास्तव हे विजयी झाले नाही. परंतु या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेले ‘गजोदर भैय्या’ नामक पात्र हे विशेष गाजले. ज्यामुळे राजू श्रीवास्तव यांची एक वेगळी ओळख या पात्रामुळे निर्माण झाली. राजू श्रीवास्तव हे एक असे स्टँडअप कॉमेडियन होते, ज्यांनी ज्येष्ठ राजकारणी लालू प्रसाद यादव यांच्यासमोर त्यांचा अभिनय केला. पण त्यावेळी राजू श्रीवास्तव यांनी केलेला अभिनय लालू प्रसाद यादव यांना इतका आवडला की, त्यांनी त्यांची स्तुती सुद्धा केली.

हे सुद्धा वाचा

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

राजू श्रीवास्तव हे बिग बी अमिताभ बच्चन यांचा सुद्धा उत्तम अभिनय करायचे, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सुद्धा राजू श्रीवास्तव यांच्या कामाची प्रशंसा केली होती. राजू श्रीवास्तव हे एक अशी व्यक्ती होते, ज्यांना पाहून अनेक नव्या स्टँडअप कॉमेडियन कलाकारांनी स्टँडअप कॉमेडी क्षेत्रात पाऊल ठेवले. यामध्ये खास करून राजू श्रीवास्तव यांचे मित्र सुनील पाल यांचे नाव घेतले होते.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजू श्रीवास्तव हे अभिनयापासून लांब होते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायमच लोकांच्या संपर्कात असायचे. महिन्याभरापासून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव आणि भाऊ दिपू श्रीवास्तव हे वारंवार माहिती देत होते.

पूनम खडताळे

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago