31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमनोरंजनRaju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे अखेर 15 दिवसानंतर शुद्धीवर आले आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून देण्यात आली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे अखेर 15 दिवसानंतर शुद्धीवर आले आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांच्याबाबत काही या काही दिवसात अनेक मृत्यूच्या अफवा देखील पसरवण्यात आल्या. पण राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या परिचयाच्या व्यक्तींकडून देण्यात येत होती. पण आज शेवटी राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आल्याची माहिती राजू श्रीवास्तव यांचे सेक्रेटरी गर्विक नारंग यांच्याकडून देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आले आहेत, पण अजूनही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे गर्विक नारंग यांनी सांगितले.

58 वर्षीय राजू श्रीवास्तव हे दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये कामानिमित्त वास्तव्यास होते. १० आगस्टला सकाळी ते हॉटेलमधील जिममध्ये शारीरिक व्यायाम करत असताना ते चक्कर येऊन पडले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स मधील डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून त्यांचा स्टेंट काढला.

परंतु या दरम्यान राजू श्रीवास्तव यांना ताप आल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. त्यामुळे आता फक्त देवाचा चमत्कार झाला आणि प्रार्थना करूनच राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते, अशी माहिती एम्स मधील डॉक्टरांकडून देण्यात आली होती. पण आज राजू श्रीवास्तव यांना तब्बल 15 दिवसानंतर शुद्ध आल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबतची माहिती सतत त्यांचे सेक्रेटरी गर्विक नारंग, त्यांचे मित्र कॉमेडियन सुनील पाल आणि त्यांची मुलगी अंतरा हिच्याकडून देण्यात येत आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, अशी विनंती राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिच्याकडून करण्यात आली होती. राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर याची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Raju Shrivastav Update : राजू श्रीवास्तव बरे होत आहेत, डाॅक्टरांकडून आली मोठी अपडेट

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

राजू श्रीवास्तव हे आपल्या विनोदांमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या विनोदांमुळे लोकांमध्ये ते अधिक प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची छोट्या पडद्यावरील ‘गजोदर भैय्या’ हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली व्यक्तिरेखा आहे. दरम्यान आता राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांचे चाहते खुश झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी