मनोरंजन

Dadasaheb Phalke Award 2020 : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादसाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सिनेमा जगतातील सगळ्यांत नामवंत असा गणला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ केंद्रसरकारकडून नुकताच जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. यंदा जाहीर झालेल्या या पुरस्कारात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचे सुद्धा नाव घोषित करण्यात आले आहे. एके काळी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा पारेख यांचा दमदार अभिनय अजूनही अनेकांना प्रेरणायी ठरतो. अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आशा पारेख यांचा अजूनही मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. दरम्यान, आशा पारेख यांचा 30 सप्टेंबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्माानित करण्यात येणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ जाहीर झाला आहे. सदर कार्यक्रम 30 सप्टेंबर रोजी पार पडणार असून आशा पारेख यांनी या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आशा पारेख यांना हा पुरस्कार जाहीर होताच सोशल मीडीयाच्या माध्यातून त्यांच्यावर कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट मानला जाणार हा पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा…

MS DHONI : पाकिस्तानच्या शोएब मलिकची तुलना थेट एमएस धोनीसोबत! माजी खेळाडूच्या वक्तव्याने हाहाकार

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

Tollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

अभिनेत्री आशा पारेख यांचा चाहता वर्ग कमालीचा मोठा आहे. त्यांच्या अभिनयाने एकेकाळी अनेकांना वेड लावले आहे. 79 वर्षीय आशा यांनी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझील’ आणि ‘कारवां’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांमधून काम केले आहे. एक प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा पारेख यांनी पुढे जाऊन निर्माती दिग्दर्शक म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख मिळवली. आशा पारेख यांनी 1990 साली ‘कोरा कागज’ या प्रसिद्ध टिव्ही मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.

लहानपणापासूनच आशा पारेख यांना नृत्याची विशेष आवड होती. आशा यांची नृत्याची आवड लक्षात घेत त्यांची आई सुधा पारेख यांनी नृत्य शिकण्यासाठी शिकवणीस पाठवत असत. दरम्यान एका समारंभात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा यांचे नृत्य पाहिले आणि त्यांना ते कमालीचे आवडले. त्यावेळी आशा पारेख यांचे वय अवघे दहा होते, परंतु आशा पारेख यांचे नृत्य बिमल रॉय यांनी एवढे आवडले होते की त्यांनी 1957 मध्ये रिलीज झालेल्या मां या चित्रपटामध्ये आशा यांना काम करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून आशा पारेख यांची सिनेमा सृष्टीतील सुंदर प्रवास सुरू झाला.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

17 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

18 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

19 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

19 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

19 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

21 hours ago