26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनआली रे आली 'सिंघम अगेन'ची हिरोइन आली!

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

रविवारी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील आपल्या व्यक्तिरिखेचा फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केला. या चित्रपटात दीपिका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अगोदरच्या भागातील हीरोइन करीना कपूरही आहे. दीपिकाची प्रसिद्धी पाहता ‘जवान’ चित्रपटाप्रमाणेच ‘सिंघम अगेन’ मध्येही ती भाव खाऊन जाणार अशी जोरदार चर्चा आहे. ‘जवान’ चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री नयनताराची प्रमुख भूमिका होती, मात्र पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आलेल्या दीपिकाचीच सगळीकडे चर्चा झाली. ‘सिंघम अगेन’ चित्रपटातही करीनाऐवजी दीपिकाचे पात्रच कणखर ठेवले आहे. सगळी प्रसिद्धी दीपिकाच खाऊन टाकेल की काय, या भीतीने करीना कासावीस झाली आहे.

जुलै महिन्यात मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंघम सिरीज चा अभिनेता अजय देवगणसह चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केली. यावेळी ‘सिंबा’ फेम अभिनेता रणवीर सिंगही होता. रोहित शेट्टीच्या पोलीस सिरीजचा भाग असलेला ‘सिंबा’ चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. ‘सिंबा’मुळे रणवीर सिंग ॲक्शन चित्रपट ही करू शकतो, ही चित्रपट समीक्षकांना खात्री पटली. ‘सिंबा’ फेम रणधीर आणि ‘सिंघम’ फेम अजय देवगन यांसह अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘सूर्यवंशी’ २०२० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही रोहित शेट्टीने केले होते.


गेल्या वर्षाच्या अखेरीस रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची घोषणा केली. सिंघम चित्रपटाच्या पूर्वीच्या दोन भागात महिला पोलीस अधिकारी नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करतात आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ही उणीव भरली जाईल, असे आश्वासन रोहीत शेट्टीने दिले होते.

पत्रकार परिषदेत उपस्थित दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेविषयी रोहितला प्रश्न विचारून हैराण केले. दोन्ही नवरा बायकोचे गुगलीने कंटाळलेला रोहित शेट्टीने अखेरीस या रस्त्यावरचा पडदा उठवला. तुमच्यासमोर उपस्थित असलेले दीपिका पादुकोणच आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असणारे असे रोहित शेट्टीने जाहीर केले. याबाबतीत औपचारिक घोषणा होताच दीपिका आणि रणवीरलाही हसू आवरले नाही.

हे ही वाचा 

अन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच ‘हिला’ केले किस

आमिरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, महाराष्ट्राची सून साकारणार मुख्य भूमिका

माहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ

चित्रपटाच्या दुसऱ्या टप्प्याचे शूटिंग सध्या हैदराबाद मध्ये सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची प्रोडक्शन टीम अजय देवगन आणि करीना कपूर सोबत हैदराबादला पोचली. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून स्त्री शक्तीचा आदर करण्यासाठी शक्ती शेट्टीला भेटा अशी कॅप्शन देत रोहित शेट्टीने दीपिकाचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्या पाठोपात दीपिका पादुकोण रणवीर सिंग अजय देवगन आणि अक्षय कुमारनेही दीपिकाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी