अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी चित्रपट ‘देवा’ चा टिझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत बोलतांना अभिनेता शाहिद कपूर म्हणाला की, हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. शाहिद कपूरने सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून बरेच लोक त्याला काहीतरी वेगळे करायला सांगत होते आणि म्हणूनच त्याने हा चित्रपट निवडला. (deva is very close to my heart shahid kapoor)
सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचे शूटिंग झाली सुरू
अभिनेता म्हणून त्याच्या ‘करिअर’मधील हा एक नवीन टप्पा आहे. ‘देवा’मध्ये शाहिद एका प्रतिभावान आणि नैसर्गिकरित्या बंडखोर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. रोशन एंड्रयूज दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी देखील दिसणार आहेत. (deva is very close to my heart shahid kapoor)
सेरेब्रल पाल्सी असोसिएशनने केला ख्रिसमस साजरा
‘झी स्टुडिओज’च्या सहकार्याने सिद्धार्थ रॉय कपूरच्या ‘रॉय कपूर फिल्म्स’ निर्मित हा चित्रपट 31 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अभिनेत्याने सांगितले की, देवा त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अनेक वर्षांपासून लोक त्याला असा चित्रपट बनवण्यास सांगत होते जे प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करेल. (deva is very close to my heart shahid kapoor)
तो म्हणाला, “माझ्यासाठी हा माझ्या करिअरचा पुढचा टप्पा आहे. हा कदाचित माझा सर्वात आव्हानात्मक चित्रपट असेल. या पात्रात बरेच काही आहे ज्याबद्दल मी सध्या बोलू शकत नाही. तुम्ही ते 31 जानेवारीला पाहू शकता.” ‘हैदर’, ‘कबीर सिंग’, ‘जर्सी’ आणि ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे पराक्रम सिद्ध करणारे कपूर म्हणाले की, या चित्रपटाच्या कथेवर मुंबई शहराचा प्रभाव आहे. (deva is very close to my heart shahid kapoor)