28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमनोरंजनधनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचे संगीत जी.व्ही.प्रकाश करणार आहेत. हा चित्रपट धनुषच्या होम प्रोडक्शन वंडरबार फिल्म्स अंतर्गत बनवला जात आहे. (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली कड़ाई’ आहे.चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वस्तीच्या बाहेर उभी असलेली एक गाडी आणि वस्तीवर दाट ढग दिसत आहेत. (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

धनुष स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. धनुषचा हा चौथा चित्रपट आहे, ज्याचे तो दिग्दर्शन करणार आहे. या आधी धनुषने आणखी तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तसेच, अभिनेता म्हणून धनुषचा हा 52 वा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचे संगीत जी.व्ही.प्रकाश करणार आहेत. हा चित्रपट धनुषच्या होम प्रोडक्शन वंडरबार फिल्म्स अंतर्गत बनवला जात आहे. (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

शेवटचा चित्रपट हिट झाला होता
धनुष याआधी ‘रायन’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. धनुषने चित्रपटात मुख्य भूमिकेसह चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता धनुष अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जादू चाहत्यांसमोर मांडणार आहे.  (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

धनुष हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार असून त्याने 4  डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. धनुषचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करतात. आता धनुषचा चौथा दिग्दर्शन असलेला ‘इडली कड़ाई’ चित्रपट कमाईच्या बाबतीत नवे रेकॉर्ड बनवतो का हे पाहायचे आहे.  (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

मात्र, धनुषने अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्याची रिलीज डेट आणि स्टारकास्टही लवकरच समोर येईल. (dhanush announced his upcoming  film Idli Kadai)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी