28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeमनोरंजनDharavi Bank: गुन्हेगारीत भिजलेल्या धारावीचं रहस्य उलगडणार! सुनील शेट्टीची पहिली वेब सिरीज...

Dharavi Bank: गुन्हेगारीत भिजलेल्या धारावीचं रहस्य उलगडणार! सुनील शेट्टीची पहिली वेब सिरीज रिलीज

कशाप्रकारे धारावीतील व्यवस्था सुरू असते, धारावीतील व्यवहार कसे चालतात. पोलिसांचे खबरी कशा प्रकारे काम करतात, अंडरवर्ल्डचे धागेदोरे कसे जोडलेले आहेत आणि एकूणच मुंबईतील अंडरबेलीचा उल्लेख या वेब सिरीजमध्ये आहे.

दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असे नाव बनले आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच असते. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समितने रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समितच्या ‘३६ गुण’ या चित्रपटाचे समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे. कायम वेगवेगळ्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारा समित रोमँटिक सिनेमानंतर अंडरबेली (underbelly) वर प्रकाश टाकणारी ‘धारावी बँक’ हिंदी वेब सिरीज घेऊन आला आहे.

धारावी ही ‘आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी’ म्हणून ओळखली जात असली तरी त्यापलीकडेही तिच्या आतील भागात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. धारावी म्हणजे केवळ एक मोठी झोपडपट्टी नसून, तिथे राहणाऱ्या प्रत्येक घटकानं तिला आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाची झोपडपट्टी बनवले आहे. घरदार नसल्यानं रस्त्यावर झोपणारे ही इथे आहेत आणि झोपड्यांचे तीन-चार मजली टॅावर उभारणारे माफिया देखील आहेत. या गोष्टी बाहेरच्या लोकांना सापडत नाहीत. गरिबी आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेली धारावी हे मोठ्या उद्योगांचेही केंद्र आहे. असे सांगून दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या आगामी हिंदी वेबसीरिज ‘धारावी बँक’ मध्ये तिथल्या जगाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘36 गुण’, ‘हुप्पा हुय्या’, ‘हाफ तिकिट’, ‘आयना का बायना’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या समित कक्कड यांची ही वेब मालिका असून त्याची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. ही वेब सिरीज 19 नोव्हेंबर रोजी मॅक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे.

हे सुध्दा वाचा

LPG: एलपीजी ग्राहकांसाठी मोठे बातमी ! घरगुती एलपीजी सिलेंडर लवकरच QR कोडसह

Solapur Mahanagarpalika : महिला आयुक्तांनी स्वीकारला सोलापूर महापालिकेचा पदभार

Bollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये, वेब मालिकांमध्ये गुन्हेगारी विश्व आणि प्रशासनाचा सामना प्रेक्षकांनी पाहिला आहे. पण या दरम्यानच्या काही गोष्टी कधीच समोर आल्या नाहीत. त्या सर्व गोष्टी ‘धारावी बँक’ मध्ये पहायला मिळणार आहेत. कशाप्रकारे इथली व्यवस्था सुरू असते, धारावीतील व्यवहार कसे चालतात. पोलिसांचे खबरी कशा प्रकारे काम करतात, अंडरवर्ल्डचे धागेदोरे कसे जोडलेले आहेत आणि एकूणच मुंबईतील अंडरबेलीचा उल्लेख या वेब सिरीजमध्ये आहे.

अभिनेता सुनील शेट्टी या मालिकेद्वारे ओटीटीच्या जगात पदार्पण करत आहे. सुनील शेट्टीने गुन्हेगारी जगताचा बॉस असलेल्या ‘थलायवन’ची भूमिका साकारली आहे. यासोबतच अभिनेता विवेक ओबेरॉय जेसीपी जयंत गावस्कर या पोलीस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. तसेच सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, जयवंत वाडकर, शांती प्रिया, ल्यूक किन्नी, वामशी कृष्णन, भावना राव, समिका भटनागर, श्रुती श्रीवास्तव, रोहित सरोज, रोहित सरोज, हे कलाकार आहेत. ती महत्त्वाची भूमिका बजावते.

ही वेबसिरीज सार्थक दास गुप्ता यांनी लिहिली आहे. छायांकन विजय मिश्रा यांचे असून संकलन आशिष म्हात्रे, अपूर्व मोतीवाले सहाय यांचे आहे. कृती विक्रम दहिया यांनी केली आहे तर किन भतिजा यांनी कॉस्च्युम डिझाइन हाताळले आहे. प्रॉडक्शन डिझाईन वाडिया खान, राकेश यादव, बीजीएम अमर मोहिले यांनी केले आहे. कास्टिंग कुणाल शाह यांचे आहे. आणि व्हिएफएक्स (VFX) पंकज अजवानी यांचे आहे. साउंड डिझायनिंग आणि मिक्सिंग अजय कुमार पीबी यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी