30 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमनोरंजनदिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या "पास आऊट" लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या “पास आऊट” लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावून बाजी मारणाऱ्या ‘पास आऊट’ लघुचित्रपटची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक राहुल दिलीप सूर्यवंशी दिग्दर्शित या लघुपटाला यंदाच्या मानाच्या नवव्या ‘राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल रिफ २०२३ च्या फिल्म फेस्टिवलमध्ये पारितोषिक मिळाले आहे. या पुरस्कारासाठी ‘पास आउट’ या एकमेव मराठी लघुपटाची स्क्रीनिंगसाठी निवड झाली. मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही खरंच गर्वाची बाब आहे. (Pass out shortflim)

‘सैराट’ आणि ‘मूळशी पॅटर्न’ फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि अभिनेत्री पायल कबरेची मुख्य भूमिका असलेल्या पास आउट या लघुचित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकाविली आहेत. ‘राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल रिफ २०२३’ या नवव्या भव्य महोत्सवात ‘पास आऊट’ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक लघुपट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या "पास आऊट" लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

दरम्यान ‘रीफ इंटरनॅशनल फ्लिम फेस्टिवल’ सोबतच ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स’ ‘गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल टिफ’, ‘मड हाऊस इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ मध्ये “पास आऊट” या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावून विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे मानाच्या युके येथील लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स’ येथे ही पास आऊट ची निवड झाली होती, ही नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे.

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या "पास आऊट" लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

‘पास आऊट या लघुपटाची कथा कविता निकम या व्यक्तीवर आधारित आहे. कविता या पात्राने तांत्रिक अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या या करिअरच्या निवडीच्या निर्णयाभोवती ही संपूर्ण कथा फिरतेय. तांत्रिक अभियांत्रिकी ही पुरुषप्रधान व शारिरीक श्रमाची अपेक्षा करणारी फिल्ड असूनही कविता त्यात करिअर घडवण्याच्या हेतूने खडतर मेहनत घेऊन, उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाते. अशाच एका मुलाखतीतील प्रसंगावर “पास आऊट” हा लघुपट भाष्य करतो.

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांनी या लघुपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन केले आहे. तर अभिजीत सोनावणे यांनी लघुपटला पार्श्वसंगीत दिले आहे. त्याचप्रमाणे लघुपटाच्या ध्वनीमुद्रणाची जबाबदारी अतुल गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर धनराज वाघ यांनी लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. ही कथा तरुणांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल कधीही न विचारणारे प्रश्न उपस्थित करते. पास आऊट मध्ये कविता समोर येणाऱ्या आव्हांवर तिच्या अडथळ्यांवर ती मात करते की नाही? हे पाहण्यासारखे ठरेल.

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

सोनालीच्या ‘डेटभेट’साठी प्रेक्षक झालेत आतुर !

स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी