33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमनोरंजनसचिन आंबात दिग्दर्शित 'रूपाचं चांदणं, नाखवा'नंतर आता 'सपान' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन आंबात दिग्दर्शित ‘रूपाचं चांदणं, नाखवा’नंतर आता ‘सपान’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी अल्बममध्ये पहिल्यादांच गाण्याचा सीक्वल काढणारे दिग्दर्शक म्हणून ओळख असणाऱ्या सचिन आंबात आणि त्याची ‘स्वप्न स्वरूप’ टीम प्रेक्षकांसाठी एक खास रोमॅंटिक गाण्याची मेजवानी घेऊन आली आहे. रात चांदणं ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर रूपाचं चांदणं हा सीक्वल, दिग्दर्शक आंबात यांनी काढला आणि याला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतरच दिग्दर्शक आंबात यांनी ‘बहिणाबाई’, ‘रूपाचं चांदणं’, ‘रातचांदणं’, ‘नाखवा’ हे एकामागोमाग एक सुपरहीट गाणे प्रेक्षकांना दिले. या धडकेदार गावरान मराठी गाण्यानंतर आता दिग्दर्शक आंबात यांनी ‘सपान’ची रोमॅंटिक मेजवानी प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. (Director Sachin Ambat’s new song ‘Sapan’ is released)

प्रेमाच्या विश्वात एक नवं कोर मराठी गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झालं आहे. आयुष्यभर ब्रह्मचारी म्हणून राहणार असा पण घेतलेला तरुण युवक त्याच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी येताच कसे प्रेम विश्वात हरवून जातो. तिच्या प्रेमात बेधुंद होऊन कसे रमतो याचे हुबेहूब वर्णन करणारे ‘सपान’ हे रोमँटिक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित आणि ‘स्वप्न स्वरूप’ निर्मित या गाण्यात अभिनेता जिगर मुकेश शाह आणि अभिनेत्री दिव्या गुप्ता ही जोडी पाहायला मिळतेय. या गावरान गाण्यात दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे.

या प्रेमगीताला गायक केवल वालंज याने त्याचा सुमधुर स्वर दिला आहे. तर मराठी गाणी आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात यांनी या गाण्याच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. ही गाणी मिलियन व्ह्यूज मिळवून सुपरहिट झाली आहेत. ‘सपान’ या गाण्याला छायाचित्रकार सागर आंबात याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. गावाकडे चित्रित झालेले हे प्रेमगीत चांगलेच नजरेत भरतेय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद ‘सपान’ या गाण्यातून ‘स्वप्न स्वरूप’ या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना चाखता येणार आहे. दरम्यान, या गाण्याने एका दिवसांत 17 हजारांहून अधिक व्यूजचा टप्पा ओलांडला आहे. या नव्या जोडीचं हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही.

हे सुद्धा वाचा : भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

अक्षय गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या ऍक्शनपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

Kishore Kumar : सुपर कलाकार किशोर कुमार सुद्धा होते बाथरुम सिंगर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी