30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमनोरंजनDirector Vaibhav Palhade : अकोल्याचा दिग्दर्शक वैभव पल्हाडे हॉलिवूड सिनेसृष्टीत करतोय पदार्पण

Director Vaibhav Palhade : अकोल्याचा दिग्दर्शक वैभव पल्हाडे हॉलिवूड सिनेसृष्टीत करतोय पदार्पण

वैभव अकोल्याचे नाव महाराष्ट्र अन् देशपातळीवर नाही तर थेट जगभरात रेखाटण्यासाठी सज्ज झाला आहे. याचे कारण आहे, प्रसिद्ध हॉलिवूड अमेरिकन संगीत दिग्दर्शक “टर्न अप तोबी” च्या व्हिडिओमधून वैभव करत असलेले दिग्दर्शन.

महाराष्ट्राने सिनेसृष्टीला आजवर अनेक कलावंत बहाल केले आहेत. अशातचं आता आगामी कालात सिनेसृष्टीत आपले नाव गाजवण्यासाटी अकोल्याचा वैभव पल्हाडे सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे वैभव अकोल्याचे नाव महाराष्ट्र अन् देशपातळीवर नाही तर थेट जगभरात रेखाटण्यासाठी सज्ज झाला आहे. याचे कारण आहे, प्रसिद्ध हॉलिवूड अमेरिकन संगीत दिग्दर्शक “टर्न अप तोबी” च्या व्हिडिओमधून वैभव करत असलेले दिग्दर्शन. वैभव सध्या त्याच्या चाहत्यांना अनेक सरप्राईजेस देण्याच्या विचारात आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. आगामी काळात तो सिने रसिकांच्या भेटीला अनेक नवनविन प्रोजेक्ट घेून येत असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे २०२३ साली “७२ रुपयांचा पाऊस” हा वैभवने दिग्दर्शित (Director Vaibhav Palhade) केलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय “द कर्स ऑफ भद्रावती” ही वेब सिरिजसुद्धा लवकरच रिलीज होणार असल्याची त्याने घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

Education : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !

Indorama Company : चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार, इंडोरामा कंपनीचा विश्वास

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दबदबा वाढला, मुंबई पोलिसांनी घेतले नमते

वैभव म्हणतो की, “मी लवकरच माझ्या चाहत्यांना माझ्या चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे एक मोठे सरप्राईज देणार आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे सर्व लघुपट “थोडीशी लिटल, मीनाज, इरा, डायरी, मी पोरस” आवडतील.”

विशेष म्हणजे, वैभव करत असलेल्या कामाची दखल २०१७ साली थेट दादासाहेब फाळके पुरस्कारात घेण्यात आली. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये त्याच्या “आय एम पोरस” आणि “द लास्ट डोअर” या लघुपटांची देखील निवड झाली होती. इतकंच नाही तर लघुपट महोत्सव २०१९ मध्ये वैभव पल्हाडे यांच्या ‘डॅडी देशमुख’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि संकलकाचा पुरस्कार मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी