30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमनोरंजनएकता कपूरचे करावे तेवढे कौतुक थोडेच, एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला...

एकता कपूरचे करावे तेवढे कौतुक थोडेच, एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला !

हिंदी मालिकातील योगदानासाठी प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला एकता कपूरला आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूयॉर्क शहरात आयोजित 51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स गालामध्ये एकता कपूरला हा सन्मान मिळेल. हा पुरस्कार मिळविणारी एकता कपूर हि पहिली भारतीय महिला ठरली आहे.

‘माझी ओळख शोधण्यात टेलिव्हिजनचा मला मोठा हातभार लागला आहे’ अशी प्रतिक्रिया एकता कपूरने दिली. एकता कपूर गेल्या पंचवीस वर्षांहून काळ हिंदी मालिकांमध्ये सक्रिय आहे. एकताने हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. एकता कपूर हिंदी चित्रपटांपेक्षा हिंदी मालिकांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते.

एकताने गेल्या काही वर्षांत क्यूंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कुसुम, कसौटी जिंदगी की अशा दर्जेदार हिंदी मालिकांची निर्मिती केली आहे. एकता ने बालाजी टेलीफिल्म अंतर्गत हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली. बालाजी टेलीफिल्मच्या स्थापनेपासून एकताची आई शोभा कपूर सहनिर्माती म्हणून काम पाहत आहे.

हे सुद्धा वाचा 
अमिषा पटेलबाबत गदर 2 चा दिग्दर्शक अनिल शर्माची कबुली; म्हणाला…
रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!
धनंजय मुंडे यांनी साधला कर्तृत्ववान शेतकऱ्यांसोबत संवाद !

मला ही ओळख मिळाल्याने नम्रता आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. हा पुरस्कार माझ्या हृदयात एक प्रेमळ स्थान आहे, जो कामाच्या पलीकडे असलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. या प्रतिष्ठित व्यासपीठाद्वारे जागतिक स्तरावर माझ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा शब्दांपलीकडचा सन्मान आहे. टेलिव्हिजन हे माझ्या महिलांसाठी कथा रचणारी स्त्री म्हणून आत्म-शोधाचे होकायंत्र आहे. हा सन्मान मला त्यांच्या आणि जागतिक मंचावर आमच्या सामायिक कामगिरीसाठी उभे राहण्याचे सामर्थ्य देतो. 2023 च्या आंतरराष्ट्रीय एमी संचालनालय पुरस्कारासाठी धन्यवाद, अशी प्रतिक्रिया एकताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी