सलमान खान आणि कतरीना कैफच्या ‘टायगर 3’ ची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होईल. यंदाच्या आठवड्यात ‘टायगर 3’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर मध्ये इम्रान हाश्मीचा लुक पाहून चाहते सलमानपेक्षा इम्रानच्या प्रेमात पडले आहेत. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर इम्रान हाश्मी बरेच दिवस ट्रेण्डवर होता. अगोदरच सलमानचे चित्रपट फ्लॉप होत असताना ‘टायगर 3’ मध्ये इम्रान हाश्मी भाव खाऊन गेला, तर काय करायचं असा प्रश्न सलमानला पडला आहे.
अक्षय कुमार सोबत ‘सेल्फी’ चित्रपट केल्यानंतर इम्रान हाश्मी ‘टायगर३’ मध्ये दिसणार आहे. हिरो म्हणून इम्रान हाश्मीचे करिअर फारसे चालले नाही. चित्रपटांपेक्षाही हीरोइन सोबत चुंबनदृश्यांसाठी जास्त चर्चेत राहिला. हळूहळू इम्रान हाश्मीला चित्रपटात मुख्य भूमिका मिळेनाशी झाली. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘टायगर 3’ मध्ये इम्रान हाश्मीला खलनायकाची भूमिका मिळाली. इमरान या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज असल्याने आजवर त्याला पडद्यामागे ठेवण्यात आले होते. ट्रेलरच्या शेवटी इम्रान चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. इम्रानला अचानक खलनायकाच्या भूमिकेत बघून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला.
Tiger and Zoya are back – to save the country and their family. This time, it’s personal!
Watch #Tiger3Trailer now – https://t.co/BRBc9Xxrw1 #Tiger3 arriving in cinemas on 12th November. Releasing in Hindi, Tamil & Telugu.#YRF50 | #YRFSpyUniverse pic.twitter.com/rktO5IRmC2— Yash Raj Films (@yrf) October 16, 2023
सिनेमात इम्रानच्या पात्राचे नाव आतिश आहे. आपल्या भूमिकेबाबत इम्रान म्हणाला,”आतिश रागाच्या भरात वावरणारा आणि टायगरला संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप काही शिकायला मिळाले. मी एका वेगळ्या खलनायकाच्या भूमिकेत आहे जो हिंदी चित्रपट सृष्टीत दुर्मिळ आहे. आतिश मानसिक रोगी आहे. आतिश आपली कटकारस्थाने यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणतो. आतिश टायगरला का सतावतोय, टायगर च्या हातून गुन्हे घडवून आणण्यात आतिशचा हेतू काय आहे, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.”
हे ही वाचा
अक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!
‘सिंघम अगेन ‘मध्ये ‘टायगर श्रॉफ’ची एन्ट्री
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार?
इम्रान आपल्या खासगी जीवनात फोटोग्राफरपासून लांब राहणं पसंत करतो. इम्रानच्या मुलाला लहान वयातच कर्करोगासारख्या घातक आजाराचा सामना करावा लागला होता. या धक्कादायक अनुभवानंतर इम्रानने पत्नी आणि मुलाला सिनेमा जगतापासून लांबच ठेवले. करिअर फ्लॉप ठरल्यानंतरही इम्रानने चर्चेत राहण्यासाठी कोणताही प्रसिद्धीचा स्टंट वापरला नाही. त्यामुळे इम्रानचा एक विशेष चाहता वर्ग अजूनही आहे.