27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमनोरंजनSonam Kapoor : सोनम कपूरच्या 'आई' पणाचे केले सर्वांनी कौतुक

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या ‘आई’ पणाचे केले सर्वांनी कौतुक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपुर आई बनली आहे. सोनमने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आई होण्याची चर्चा स‍िनेजगतामध्ये सुरु होती. सोनमवर प्रेम करणाऱ्या तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपुर आई बनली आहे. सोनमने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आई होण्याची चर्चा स‍िनेजगतामध्ये सुरु होती. सोनमवर प्रेम करणाऱ्या तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला बाळ झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. तिने या बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 20.8.2022 रोजी आमच्या सुंदर बाळाचं स्वागत केलं. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचार‍िका, मित्र आणि कुटुंबियांचे आभार, ही फक्त सुरुवात आहे. परंतु आम्हाला माहित आहे की, आमचं आयुष्य कायमचं बदललं आहे – सोनम आणि आनंद

 सोनम कपुरवर मनोरंजन जगतामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनम कपुरला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. नीतू कपुरने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. बाळाच्या आगमनामुळे सोनम कपुर आणि पती आनंद आहूजा आनंदात आहेत. सोनम कपुरने मार्चमध्ये आपल्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त‍िने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सोनम कपुरचा 2018 मध्ये उदयोगपती आनंद आहूजा सोबत मुंबईमध्ये धुमधडाक्यात विवाह झाला. बॉलिवुडच्या स्टायल‍िश अभ‍िनेत्रीमध्ये तिची गणना केली जाते.

तर रिया कपूरने सोनम कपूरच्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.‍ त्याला तिने कॅन्शन दिले आहे की, रिया मासी ठीक नही है. तुम बहुत ज्यादा क्यूट हो. आय लव यू, सोनम कपूर तुम बहु बहादुद माँ हो और आनंद आहूजा बहुत ज्यादा प्यार करने वाले पिता…. और हां नई नानी सुनीत कपूर की भी खुशी का ठिकाना नहीं है’

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

सोनम कपूरने एकूण 18 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी 7 चित्रपट सुप हिट आहेत. तर 11 चित्रपट फ्लॉप आहेत. ‘सांवर‍िया’ हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर तिने ‘द जोया फैक्टर’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘संजू ‘, ‘वीरेदी वेडिंग’, ‘पैड मॅन ‘, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘डॉली की डोली’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रांझणा’, ‘प्लेअर्स’, ‘मासून’ ‘खुबसुरत’ आदी चित्रपटांत तिने भूमीका केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी