टेलिव्हिजनवर मालिका पाहण्याचं येडं संपूर्ण भारतात आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नविन कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं दडपणं मालिका निर्माते, दिग्दर्शक शिवाय टेलिव्हिजन चॅनेलला देखील असतो. त्यामुळेच प्रत्येकवेळी एक नवी कथा सादर करण्याचा चॅनेलचा प्रयत्न असतो. अशीच एका नव्या कथेवर आधारितमालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मालिकेच नाव ‘फालतू’ आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधीच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत असून मालिकेची सर्वत्र तचर्चा रंगताना दिसत आहे.
स्टारप्लसचा बहुप्रतिक्षित शो ‘फालतू’ प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे आणि प्रेक्षक एका नकोशी असलेल्या मुलीची अनोखी कथा पाहण्यासाठी उत्साहित आहे. निर्मात्यांनी शोच्या रिलीजच्या आधी आणखी एक प्रोमो प्रदर्शित केला असून, ह्या प्रोमो ने दर्शकांचा उत्साह अजून वाढवला आहे. ह्या प्रोमो मध्ये आपण निहारिका चोक्सी आणि आकाश आहुजा यांनी साकारलेल्या पात्रांमधील एक मजेशीर क्षण पाहू शकतो. दोन्ही पात्रांमधील केमिस्ट्री लोकांना पहायला नक्की आवडेल.
हे सुद्धा वाचा
IND vs SA : भारताचा पराभव पाकिस्तानला झोंबलाय! शोएब अख्तरचा झालाय ‘हार्टब्रेक’
INFLATION : देशातील महागाईचा सामना करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक! आरबीआयचे विधान
‘फालतू’ च्या आयुष्यात तिच्या अडथळ्यांपेक्षा विलक्षण महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. ‘फालतू’चे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न असून, आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणींसह, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिच्या स्वप्नांचा पाठलाग करते. जेव्हापासून निर्मात्यांनी त्यांचा आगामी शो ‘फालतू’ जाहीर केला आहे, तेव्हापासून दर्शक कथेकडे आकर्षित झाले असून, शो प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
स्टार प्लस अशा समस्या मांडण्यात अग्रेसर असून, त्यांचा आगामी शो ‘फालतू’ही एक अनोखी कथा आहे जी मुलीच्या सामर्थ्याबद्दल समाजाला संदेश देते. ‘फालतू’ मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित होणार असून, ‘फालतू’ची कथा कशी उलगडते हे पाहणे नक्कीच रोमांचकारक असेल.