29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरमनोरंजनSiddhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणात जोडले गेले...

Siddhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणात जोडले गेले प्रसिद्ध गायिकेचे नाव

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणाचा तपास सातत्याने पंजाब पोलिसांकडून करण्यात येत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले होते. सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moose Wala) खून प्रकरणाचा तपास सातत्याने पंजाब पोलिसांकडून करण्यात येत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले होते. सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सिद्धूचे निधन होऊन अनेक महिने उलटले, पण आजही त्यांचे कुटुंब आणि गायकांचे चाहते त्या दुःखातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. आजही सिद्धू मुसेवालाचे चाहते संपूर्ण सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. तसेच सिद्धू मुसेवालाची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे हे अद्याप तरी पूर्णतः स्पष्ट झालेले नाही. तसेच याप्रकरणी आता पर्यंत काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात आणखी एका नावाची भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मूसेवालाची जवळची मैत्रीण, मानलेली बहिण आणि प्रसिद्ध पंजाबी गायिका अफसाना खान हिचे दाखल नाव जोडले गेले आहे. एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) अफसाना खानची काही तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. अफसाना खानला या हत्येशी संबंधित अनेक गोष्टी माहीत असल्याचं सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येआधी सिद्धूला धमकीचे फोन येत होते. याबाबतची माहिती अफसाना खान हिला सुद्धा होती, असेही सांगण्यात आले आहे. मात्र ही माहिती अफसाना खान दिने कोणालाही दिली नाही.

अफसाना खानने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक अशी गाणी गायलेली आहेत. जी खूप प्रसिद्धही झाली आहेत. अफसानाने 2012 मध्ये रिअॅलिटी सिंगिंग शो ‘व्हॉइस ऑफ पंजाब सीझन 3’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘रायझिंग स्टार’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली. अफसानाचे ‘जट्टा सारेम वे तू ढाका करते’ हे गाणे खूप गाजले. तसेच अफसानाचे ‘पता नहीं जी कौन सा नशा करता है’ हे गाणेही खूप प्रसिद्ध झाले. तिचे हे गाणे प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेले गाणे आहे.

हे सुद्धा वाचा

Salman Khan : ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सलमानला राहण्यासाठी असुरक्षित! मुंबई महापालिकेचा अहवाल

Bigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री ‘बिग बॉस मराठी’च्या घरात

Mumbai News : फटाके न उडवण्याचा सल्ला देणाऱ्या तरुणाची हत्या! तिघेही आरोपी अल्पवयीन

अफसाना खानने ‘बिग बॉस’च्या 15 व्या सीझनमध्येही भाग घेतला होता. जिथे तिने खूप तमाशाही केला. तिच्या बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अफसाना खान आणि वाद हे समीकरण फार जुने आहे. याआधीही अनेक वादांमध्ये तिचे नाव घातले गेले होते. 2020 मध्ये अफसाना खान विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये सिंगरवर सरकारी शाळेत विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त गाणे गाण्याचा आरोप करण्यात आला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!