30 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमनोरंजनप्राजक्ता कोळीचं एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलं... चाहत्यांना दिली गोड बातमी

प्राजक्ता कोळीचं एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलं… चाहत्यांना दिली गोड बातमी

प्रसिद्ध मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळीनं अखेरीस प्रियकर वृशांक खनलसोबत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं. आपल्या इंस्टाग्रामवर वृशांक माझा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं तिनं पोस्ट करत दोघांचा एकत्र फोटो पोस्ट केला. फोटोत प्राजक्ताच्या बोटात अंगठी पाहून नेटीझन्सला दोघांनीही साखरपुडा केल्याची गोड बातमी मिळाली.

प्राजक्ता ही प्रसिद्ध युट्यूबर असून तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ आहे. २०१२ साली प्राजक्तानं ‘मोस्टलीसेन’ युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनलवर विनोदनिर्मितीचे विषय, सिनेतारकांच्या मुलाखतीमुळे प्राजक्ता भलतीच प्रसिद्ध झाली. प्राजक्ताची वाढती प्रसिद्धी पाहता तिला आता सिनेमा आणि वेबसिरीजच्याही ऑफर्स येऊ लागल्या आहे. ऐन कोरोनाकाळात प्राजक्ताला करण जोहरचा सिनेमा मिळाला. वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या सिनेमात प्राजक्तानं वरुणच्या बहिणीची भूमिका निभावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

नेटफ्लिक्सवरील ‘मिसमॅच’ या वेबसिरीजमुळे प्राजक्ताच्या प्रसिद्धीत अजून भर पडली. ‘मिसमॅच 2’ लाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. प्राजक्तानं अभिनेत्री विद्या बालनसोबतही नियत वेबसिरीज केली. सध्या प्राजक्ता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. सिनेमा आणि ओटीटीमुळे प्राजक्तानं आपल्या युट्युब चॅनेलकडे दुर्लक्ष केल्यानं तिच्या युट्यूब चॅनेलची प्रसिद्धी कमी होऊ लागली आहे. यातच अचानक प्राजक्तानं आपला साखरपुडा आटोपल्यानं बऱ्याच नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा 

असं काय घडलं…. चित्रपट नयनताराचा चर्चा दीपिकाची!

स्वरा भास्करचे बेबी बंप फोटोशुट झाले व्हायरल !

अजय देवगणचा ‘सिंघम३’ येणार, अभिनेत्री कोण असणार ?

प्राजक्ता सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतेय, याबाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच प्राजक्ता लवकर लग्न करून केवळ युट्युबवर लक्ष केंद्रित करत असणार असल्याच्या चर्चाना उधाण आलंय. प्राजक्तानं नुकताच ३० वा वाढदिवस साजरा केला. आपल्या आईवडिलांसाठी तिनं सध्या तात्पुरता साखरपुडा आटोपला असून लग्नाला वेळ असल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी