27 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरमनोरंजन'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सिक्वेल येणार?

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार?

इटलीतील खोल समुद्रातील स्कुबा डायव्हिंग, टोमॅटो फेस्टिवल, बैलांची शर्यत आणि उंच आकाशातून विमानातून जमिनीवर घेतलेली थरारक उडी हे सर्व आठवले की ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या चित्रपटाचं नाव डोळ्यासमोर येतं. अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा नवा सिक्वेल येणार आहे. चित्रपटाचे निर्माता फरहान अख्तर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर सिक्वेलची हिंट दिली. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१२ साली ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल कतरिना कैफ आणि कल्की कोचीन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली. या चित्रपटाचं कथानक, गाणी,कविता, संवाद सगळच लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. दहा वर्षानंतरही तीन जिवलग मित्रांची बॅचलर प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा होत आहे. कारण फरहानच्या नव्या इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांना याबाबतची हिंट दिली आहे. फरहानने चित्रपटातील इमरान या पात्राचा लुक इंस्टाग्रामवर पोस्ट केला. हा फोटो शेअर करत त्याने दिग्दर्शक जोया अख्तरला टॅग केलं. ‘आपण पुन्हा एकदा दुसरा रोड ट्रिपवर जायला हवं का ‘ असा प्रश्न फरहानने विचारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)


या पोस्टवर रितिक रोशन आणि अभय देओल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. अभय देओल म्हणाला,’२०१२ पासून माझी बॅग तयार ट्रिपसाठी तयार आहे. तुमचं काय?’ रितिक रोशनने यावर कमेंट करत लिहिलं’चला जाऊया’. तिघांचे संवाद ध्यानात घेत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच भेटीला येणार असल्याची खात्री सर्वांना पटली.

२०१२ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. चित्रपटाचे यशाने ऋतिक रोशन आणि कतरीना कैफ यांना मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. मात्र फरहान अख्तर आणि अभय देओल यांना काहीच फायदा झाला नाही. चित्रपटातील मुख्य नायक म्हणून ऋतिक रोशनला प्रमोट केले गेले. वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मुख्य नायक म्हणून ऋतिक रोशनला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटासाठी नामांकन मिळालीत. याबद्दल अभय देओलने जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. या सर्व वादावर दिग्दर्शिका जोया अख्तरने मौन बाळगले. तीन कलाकारांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने चित्रपटाचा सिक्वेल येणार नाही, अशी शक्यता चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली होती.

हे ही वाचा 

करीनाच्या ‘द बकिंगहॅम मडर्स’ची चर्चा, लवकरच झळकणार ‘मामी’मध्ये!

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

सध्यस्थितीत ऋतिक रोशनकडे ‘फायटर’,’वॉर २’ हे दोन चित्रपट आहेत. मुंबईत ‘फायटर’चे शूटिंग सुरू आहे. कतरीना कैफकडेही बिग बजेट चित्रपट आहेत. कतरिना आणि सलमान खानचा ‘टायगर ३’ येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. वर्षा अखेरीस कतरीना विजय सेतुपतीसोबत ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटात दिसेल. फरहान अख्तर वेब सिरीज निर्मितीमध्ये व्यस्त आहे. अभय देओल जून महिन्यात आपल्या भाच्याच्या लग्नात मीडियाला दिसला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी