33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमनोरंजनFighter Release Date : भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट 'फायटर'ला मिळाला प्रजासत्ताक...

Fighter Release Date : भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट ‘फायटर’ला मिळाला प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट 'फायटर' २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट ‘फायटर’ २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट सकरणार असून, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्रितिक आणि दिपिका गेली अनेक वर्ष सिने क्षेत्रात काम करत आहेत. मात्र, हा त्यांचा पहिलाच एकत्रित सिनेमा आहे. त्यामुळे हँडसम, डॅशिंग असणाऱ्या ह्रितिक सोबत सुंदरतेचैा कळस असणाऱ्या दिपिकाची स्क्रेनवरील केमीस्ट्री कशी असेल याबाबत उत्कंठा असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतातील सर्वात मोठे अ‍ॅक्शनपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, ‘फायटर’च्या निमित्ताने पाहाल्यांदाच निर्मात्याच्या खुर्चीत बसत आहेत. या चित्रपटाला भव्य व आकर्षक बनवण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली असून, प्रेक्षकांना सेल्युलॉइडवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे एक सुवर्णयोग आहे.

हे सुद्धा वाचा

PAK vs ZIM : पाकिस्तानचा पराभव होताच सोशल मीडियावर ‘मिस्टर बीन’ ट्रेंडिंगला; वाचा काय आहे प्रकरण

MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी राउंड 2 वेब पर्याय प्रवेश प्रक्रिया सुरू! असा करा अर्ज

Health tips : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 7 गोष्टी नियमित खा! वाचा सविस्तर

‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. निर्माता आणि व्हायकॉम18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांचा भारतीय मूळ असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्शन चित्रपट निर्माण करून जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः ह्रितिक रोशनने या सिनेमाचे पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता ह्रितिक सोबतंच दिपीकाच्या चाहत्यांना देखील या सिनेमाची ओढ लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी