29 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरमनोरंजन'गदर2' मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल

‘गदर2’ मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर2’ ने 482.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तीन आठवड्यात ‘गदर2’ने कमाईचे विविध विक्रम रचले आहे. पाच दिवसांत अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘जवान’साठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालेले असताना ‘गदर2’समोर 500 कोटी रुपयांची कमाई करणे आव्हान ठरणार आहे.

तारासिंग आणि सकीनाच्या प्रेम कहाणीवर आधारित ‘गदर- एक प्रेम कथा’ चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. फाळणीदरम्यान पंजाबी मुंडा तारासिंग मुस्लिम सकीनाच्या प्रेमात पडतो. त्यांच्या प्रेमातील अडथळे, पाकिस्तानातून पत्नी सकीनाला परिवारासह सुरक्षित भारतात आणण्याच्या लढाईला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. 23 वर्षानंतर 11 ऑगस्ट रोजी ‘गदर 2’ प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच ‘गदर 2’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दुसऱ्या भागात तारासिंग आपल्या मुलासाठी पाकिस्तानात जातो.

दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. चार दिवसातच चित्रपटाने 121 कोटी रुपयांची कमाई केली. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘गदर 2’ 450 कोटीपर्यंत पोहोचला. ‘गदर2’मुळे सनी देओल आणि अमिषा पटेलचे फ्लॉप करियर पुन्हा बहरले. ‘गदर2’चे यश पाहता सिनेमा येत्या काही दिवसातच 500 कोटीपर्यंत पोहोचेल अशी आशा चित्रपटसृष्टीला आहे.

हे सुद्धा वाचा 
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
सरपंचाने स्वतःची जमीन पडीक ठेवून गावाला दिलं पाणी
मल्लिकार्जुन खरगे यांना वंचितचे खुले पत्र!

7 सप्टेंबरला अभिनेता शाहरुख खान आणि दक्षिणात्य अभिनेत्री यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’ प्रदर्शित होत आहे. जगभरात या सिनेमाची प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंगही सुरू झालं आहे. शाहरुखची क्रेस पाहता ‘गदर 2’ थोडीफार झळ बसण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर नंतरचा विकेंडला प्रेक्षकांची आवड समजेल, असे चित्रपट व्यापार तज्ञ म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी