27 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरमनोरंजन'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच! 'हा' साकारतोय गडकरींची प्रमुख भुमिका

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! ‘हा’ साकारतोय गडकरींची प्रमुख भुमिका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोमवारी (16 ऑक्टोबर) नागपूर येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आले होते.

नुकतेच गडकरी या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये नितीन गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे. पण या अभिनेत्याबद्दल फारशी माहिती नसल्याने ‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती, मात्र आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.


‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका अभिनेता राहुल चोप्रा साकारणार आहे. नुकतेच गडकरी फिल्म्सच्या इन्स्टाग्राम पेजवरून ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये राहुल चोप्रा दिसत आहे. पोस्टरला कॅप्शन देण्यात आले आहे की, “देशाच्या विकासासाठी कटिबद्ध, अभ्यासू आणि प्रभावी वक्ता, भारताचे केंद्रीय मंत्री, हायवेमॅन ‘श्री. नितीन गडकरी’ यांच्या भूमिकेत अभिनेता राहुल चोपडा. ‘गडकरी’ २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत !” ‘गडकरी’ चित्रपटातील कलाकारांची माहिती गडकरी फिल्मच्या इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.

तसेच या पेजवर टीजरदेखील टाकण्यात आला आहे. “या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्यांनी होईल तेव्हा मी आनंदाने म्हणून शकेन; मी नितिन जयराम गडकरी!” भारताचे हायवेमॅन श्री. नितिन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा चित्रपट, ‘गडकरी’ २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.” असा कॅप्शन देण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gadkari The Film (@gadkarithefilm)


हे ही वाचा 

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

अन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच ‘हिला’ केले किस

विखुरलेल्या केसात चिडलेल्या कार्तिकला पाहून फॅन्स म्हणाले..

आगामी ‘गडकरी’ या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या डोर्ले या कांचन गडकरीची भूमिका साकारणार आहे. वेदांत देशमुख या चित्रपटात श्रीपाद रिसालदार यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती काळकर, पुष्पक भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘गडकरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. 27 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनुराग भुसारी, मिहिर फतेह यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. आता चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे निर्माते लवकरच ट्रेलरही रिलीज करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी