29.9 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमनोरंजनदिवंगत अभिनेता रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच बोलला गश्मीर

दिवंगत अभिनेता रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच बोलला गश्मीर

नेत्वा धुरी, मुंबई :  प्रसिद्ध दिग्गज अभिनेते यांचे 15 जुलै रोजी पुण्यातील तळेगाव येथे आकस्मिक निधन झाले. महाजन यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आल्याने त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक नातेसंबंधांबाबत गश्मीरने अखेरीस मौन सोडले असून, वडिलांबाबत चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यानं उत्तरं दिली.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून ‘आस्क गश- फन थिंग्स ओन्ली’ स्टोरीवर गश्मीर आपल्या चाहत्यांशी दिलखुलासपणे गप्पा मारत होता. आपल्या आगामी प्रकल्पाबद्दल ते कौटुंबिक नातेसंबंधाबाबत कश्मीरनं खूप प्रांजळपणे उत्तरं दिली. तुम्ही चेहऱ्यावर दाढी का नाही ठेवत असा चाहत्यानं प्रश्न विचारताच आईला आवडत नसल्याचं सांगितलं. पत्नी गौरीला परवा काय गिफ्ट दिलं, मुलगा व्योम आणि थेट लग्नाची मागणीबद्दल त्यानं मनमोकळेपणानं संवाद साधला. लग्नाची मागणी होताच अगोदर माझ्या बायकोशी बोला, बायकोच्या गिफ्ट बद्दल विचारतात मला शांततेनं जगू द्या, याबद्दल विचारूच नका अशी गमतीशीर उत्तरं दिली.

इंस्टाग्रामवर पोस्टवर एका चाहत्यानं गश्मीरशी त्याचे दिवंगत वडील व ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनीबद्दल संवाद साधला. तुझे वडील तळेगावला राहताहेत बद्दल पूर्वकल्पना असती तर मी त्यांना नक्कीच भेटलो असतो. गॉड ब्लेस यु डियर असा प्रेमळ संदेश दिला. या संदेशावर कश्मीरनं त्वरितच हृदयाचे इमेजेस पोस्ट केले. तुमच्या वडिलांचे चित्रपट आम्ही आजही घरी आवडीनं पाहतो. रवींद्र महाजनी म्हणजे सुंदर व्यक्तिमत्व असा चाहत्याचा संदेश वाचताच गश्मीर ‘निश्चितचं’ असा प्रेमळ संदेश दिला. तुमच्या आई-वडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव मॅरेज? मधु मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कसा याबद्दल जाणून घ्यायला आवडेल प्रश्नाकडे गश्मीरनं कानाडोळा केला नाही. आई-वडिलांचा लव मॅरेज होतं. प्रेम तिच्या बाजूनंच कायम राहिलं असं प्रांजळपणे सांगितलं. इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये गश्मीरनं आपल्या वडिलांबद्दल चुकीच्या पद्धतीनं टीका केली नाही.

हे सुद्धा वाचा 
शिवरायांसोबत बाबासाहेब पुरंदरेंचे शिल्प; कारवाई करा, अन्यथा सुट्टी नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा
ठाण्यातील ‘हा’ देखणा घुमट कोणी बनविला ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
ड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी

गश्मीर ‘छोरी 2’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘छोरी 2’मध्ये छोरा काय करतोय, या प्रश्नावर गश्मीरनं ठामपणे मत मांडली. छोरा छोरीच्यापाठी खंबीरपणे उभं राहायचं, छोरीला आपली लढाई लढू देण्याचं काम करतोय. प्रत्येक छोऱ्याने छोरीपाठी उभं राहावं असं आवाहन करायला गश्मीर विसरला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी