33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; टवाळखोरांच्या गोंधळात पत्रकारांना मारहाण

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; टवाळखोरांच्या गोंधळात पत्रकारांना मारहाण

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात टवाळखोर तरुणांनी पत्रकारांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मागील काही महिन्यांत गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे. डान्सर गौतमी पाटील तमाशाच्या अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेऊन गावोगावी जाऊ लागली आहे. नुकत्याच तिच्या नाशिकमधील लावणी कार्यक्रमात टवाळखोर तरुणांनी गोंधळ घालत दोन पत्रकारांना मारहाण करत कॅमेरा तोडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही पत्रकारांना मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिकमधील एका एनजीओने रुग्णवाहिकेसाठी पैसे गोळा करण्यासाठी गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी थरारक घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. सदर कार्यक्रम तब्बल दोन तास उशिराने सुरू झाल्याने उपस्थितांना आधीच संतापलेले होते. कार्यक्रमात पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. परंतु गौतमी पाटील डान्स करत असताना काही पत्रकार व्हिडिओ घेण्यासाठी स्टेजजवळ गेले असता त्यावरून काही तरुणांनी दमदाटी करायला सुरुवात केली. आरोपींनी पत्रकारांचे पाय खाली ओढून त्यांना खाली पाडलं. तसेच त्यांना मारहाण देखील करण्यात आली. या गोंधळात पत्रकारांच्या कॅमेऱ्यांचं नुकसान झालं आहे.

गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात टवाळखोर तरुणांनी पत्रकारांना मारहाण केल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान पोलिसांनी जखमी पत्रकारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. दोन्ही पत्रकारांची प्रकृती स्थिर असून त्यानंतर आता आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: 

पाहुणं जेवला का? म्हणताच 25 लोक शेडसोबत कोसळले; गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

गौतमी पाटीलला झाली लगीनघाई!

गौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

Gautami Patil, Gautami Patil viral, Gautami Patil Lavani dance, Gautami Patil Nashik event media beaten up by Nashikers

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी