सिनेमा जगतातील क्युट जोडी रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख पुन्हा आई-बाबा होणार आहेत. दोघांनी शनिवारी एका पार्टीत हजेरी लावली होती. त्यावेळी जिनिलियाचे पोट वाढलेले दिसून आले. समाजमाध्यमावर ही बातमी पसरताच जिनिलीया गरोदर असल्याची बातमी खोटी असल्याचं रितेश देशमुखनं सांगितलं. मला अजून दोन-तीन मुलं झाली तर नक्कीच आवडेल, सध्या ही बातमी खरी नाहीये अशी मिश्किल प्रतिक्रिया रितेशनं दिली.
रितेश आणि जिनिलिया यांनी दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ ला एकमेकांशी लग्नगाठ बांधली. त्यांना रियान आणि राहील अशी दोन मुले आहेत. घर आणि मुलाबाळांच्या संगोपनासाठी जिनिलियानं सिनेमातून दहा वर्ष ब्रेक घेतला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. रितेशनं ‘वेड’ चित्रपटातून मराठी सिनेमात दिग्दर्शक म्हणून तर जिनीलियानं मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. वेड चित्रपटा नं तब्बल ७५ कोटी रुपये कमावले. जिनिलीयानं नुकतंच ओटीटी माध्यमावरही आगमन केलं.
तिचा जिओ सिनेमावरील ‘ट्रायल पिरियड’ हा सिनेमाही गाजला. इंडस्ट्रीतील हे क्युट कपल अनेकदा पार्टी आणि सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसून येतं. शनिवारी दोघंही एका पार्टीत एकत्र दिसून आले. त्यावेळी जिनिलियानं निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. दोघांनीही फोटोग्राफरसाठी एकत्र पोझ दिली. फोटोत जिनिलीयाचं पोट वाढल्याचं दिसून आल्यानं नेटीझन्सनी आता दोघांकडून गुड न्यूज असल्याचा कयास लावला.
रितेश एरव्ही स्वतःवरील टीका किंवा विनोदी प्रतिक्रियाकडे दुर्लक्ष करण्यास प्राधान्य देतो. पत्नी जिनिलीयावर कोणती विचित्र बातमी आल्यास रितेश तातडीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया कळवतो. शनिवारपासून जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. सोमवारी रितेशनं इंस्टाग्राम स्टोरीवर जिनिलिया गरोदर असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला.
हे सुद्धा वाचा
ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर पटकाविला तिसरा क्रमांक
मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री शिंदे
संभाजी भिडेंनी सरकारला वाटले सर्टिफिकेट; एकनाथ शिंदे लबाड नाही, फडणवीस बेईमान नाहीत, अजित पवार काळजी असलेला माणूस!
मला अजून दोन-तीन मुलं जन्माला घालायला नक्कीच आवडेल, सध्या जिनिलिया गरोदर असल्याची बातमी खरी नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यानं दिली. याआधीही रितेशनं ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर माझ्या पत्नीचं नाव जिनिलीया असल्याचं मराठीत पोस्ट केलं होतं. बरेचदा तिचं नाव जेनेलिया असं छापून आल्यानं रितेशनं थेट ट्विटरवरच मराठीतील अपेक्षित नाव पोस्ट केलं. त्यानंतर बऱ्याच प्रसारमाध्यमानी जेनेलियाऐवजी जिनिलिया असे नाव लिहिण्यास सुरुवात केली.