34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनAzadi Ka Amrit Mahotsav : राज्यपालांचा 'अमराठी बाणा', आधी 'मराठी' कलावंतांना डावलले,...

Azadi Ka Amrit Mahotsav : राज्यपालांचा ‘अमराठी बाणा’, आधी ‘मराठी’ कलावंतांना डावलले, नंतर ‘अमराठी’ कार्यक्रमाचे थाटात उदघाटन केले !

ज्या कार्यक्रमातून मराठी कलाकारांना वगळण्यात आले, तोच कार्यक्रम राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हिंदी कलाकारांना घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घ्यायचे सोडून राज्यपाल यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले.

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा आणि पु. ल. देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये पाच दिवसीय भारत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी केले. पण सदर कार्यक्रम हा आधी मराठी कलाकारांना घेऊन करण्यात येणार होता, पण अचानक हा कार्यक्रम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेतील कलाकारांना करण्यासाठी देण्यात आला. ज्यामुळे आता याविषयी मराठी कलाकारांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे. पण महाराष्ट्रात राहून, राज्याच्या सर्वोच्च अशा राज्यपाल पदी बसून सुद्धा राज्यपालांकडून या प्रकरणी कोणतीच वाच्यता करण्यात आलेली नाही. इतकेच नाही तर त्यांनी या कार्यक्रमाचे थाटात उदघाटन केले.

‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त आयोजित पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमातून मराठी कलाकारांना वगळण्यात आले. त्यामुळे मराठी कलाकारांचा अपमान केल्याप्रकरणी मराठी चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक झगडे यांच्या नेतृत्वात लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे. परंतु हे आंदोलन पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात करण्याची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठी हे आंदोलन आजाद मैदान येथे करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav मराठी कलाकारांचा कार्यक्रम हटवून, अमराठी कार्यक्रमाचे राज्यपालांनी केले उदघाटन !

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणविसांना शिवसेना आमदाराने फटकारले

पण लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, ज्या कार्यक्रमातून मराठी कलाकारांना वगळण्यात आले, तोच कार्यक्रम राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हिंदी कलाकारांना घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घ्यायचे सोडून राज्यपाल या कार्यक्रमाचे उदघाटन करतात, यातूनच त्यांचा मराठी द्वेष दिसून येतो. याआधी सुद्धा राज्यपालांनी महाराष्ट्रात राहून मराठी लोकांविरुद्ध वक्तव्ये केलेली आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. आता तर मराठी कलाकारांवर अन्याय होऊन सुद्धा राज्यपाल मूग गिळून गप्प बसले असल्याने राज्यपालांचा अमराठी बाणा सरळ सरळ त्यांच्या कृतीतून दिसून येतोय.

दरम्यान, नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक, ज्येष्ठ रंगकर्मी व केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या सदस्या वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाट्य संस्थेचे (एनएसडी) संचालक रमेश चंद्र गौड व पु ल देशपांडे अकादमीचे संचालक संतोष रोकडे प्रामुख्याने होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी