31 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमनोरंजनगदर 2 मध्ये सनी देओलच्या ऐवजी गोविंदाला मिळणार होता रोल?

गदर 2 मध्ये सनी देओलच्या ऐवजी गोविंदाला मिळणार होता रोल?

अभिनेता सनी देओलच्या ‘गदर2’ ने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडला आहे. सनी देओलच्या करिअरमधील ‘गदर 2’ हे सर्वात जास्त हिट फिल्म ठरली आहे. ‘गदर2’ची हवा सुरु असतानाच अभिनेता गोविंदाने या चित्रपटासाठी आपणच फर्स्ट चॉईस असल्याचा खळबळजनक खुलासा प्रसारमाध्यमांसमोर केला. अखेरीस दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटासाठी सुरुवातीपासूनच अभिनेता सनी देओल पहिली चॉईस असल्याचे सांगितले.

अभिनेता सनी देओल आणि गोविंदाने एकाच वेळी आपले करिअर सुरू केले. गोविंदा ऐन ऐशीच्याकाळात एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले. त्या तुलनेत सनी देओलची प्रसिद्धी कमी राहिली. ‘त्रिदेव’,’घायल’, ‘विश्वात्मा’ या चित्रपटांमुळे सनि देओलला ओळख मिळाली. बॉलीवूड मध्ये शाहरुख खान,आमिर खान आणि सलमान खान यांचे पदार्पण झाल्यानंतर हळूहळू सनी देओलची मागणी कमी होऊ लागली. गोविंदाने राजकारणात प्रवेश केला. कालांतराने गोविंदाची राजकीय कारकीर्द डगमगू लागली. गोविंदाचे लागोपाठ सर्व सिनेमे फ्लॉप ठरले.

2001 साली सनी देओलचा ‘गदर-एक प्रेम कथा’ सिनेमा प्रदर्शित झाला. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यानच्या प्रेमकथेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सनी देओल रातोरात सुपरस्टार झाला. तब्बल 21 वर्षानंतर गदर सिनेमाचा सिक्वेल प्रदर्शित झाल्यानंतर दर दिवसाला नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे. दरम्यानच्या वीस वर्षांच्या काळात सनी देओल, गोविंदा या दोघांचेही सिनेमे चालले नाहीत.

हे सुद्धा वाचा 
शाहरुखच्या ‘जवान’चा प्रदर्शनाआधीच जलवा; पण आमिर खानचा आगामी चित्रपट कधी प्रसिद्ध होणार ? 

परिचारिका नोकर भरतीसाठी आलेल्या महिलांची ठाणे महापालिकेकडून गैरसोय, एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार
एकता कपूरचे करावे तेवढे कौतुक थोडेच, एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला !  

सनी देओलचा ‘गदर 2’ यशस्वी होताच त्याला रातोरात पुन्हा प्रसिद्धी मिळाली. गदरसाठी आपणच फर्स्ट चॉईस असल्याचे गोविंदाने सांगायला सुरुवात केली. अखेरीस गदरच्या दिग्दर्शकांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी गोविंदासोबत महाराजा या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या गप्पा रंगलेल्या असताना आगामी ‘गदर’ सिनेमाच्या कथानकाबद्दल केवळ चर्चा केली. गोविंदाने मला चित्रपटाबद्दल सांगू नकोस,अशी प्रतिक्रिया दिली. गदर चित्रपट त्याला ऑफर केल्याचा गैरसमज झाला असावा, असेही दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी