29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमनोरंजनअभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

बॉलीवूडमधील कलाकार मंडळी ज्यांनी त्यांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले.

अभिनय किंवा संगीतात करिअर करण्यासाठी एखाद्याला उच्च स्तरावरील शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास येतो, जो कला क्षेत्रातील करिअरसाठी महत्वाचा आहे. बॉलीवूडमध्ये अनेक असे नामवंत कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटांसाठी आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडलं. पुढे जाऊन चित्रपटात मिळणाऱ्या यशामुळे या मंडळींनी आपलं शिक्षण पूर्ण केलचं नाही. पण याच बॉलीवूडमध्ये असेही काही कलाकार मंडळी आहेत ज्यांचे शिक्षण पाहून तुम्ही ही चकित व्हाल, तर पाहूया कोण आहेत हे कलाकार…….

1. अमिताभ बच्चन

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाबिग बी म्हणजेच जेष्ट अभिनेते अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील अशा स्टार्सपैकी एक आहेत. अमिताभ यांनी नैनितालच्या शेरवुड कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे आणि त्यानंतर त्यांनी किरोरी माल या कॉलेजमधून कला आणि विज्ञान या विषयात पुढचे शिक्षण घेतले. याशिवाय, त्यांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी सुद्धा प्रदान करण्यात आली आहे.

2. शाहरुख खान

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाबॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान देखील सर्वात जास्त शैक्षणिक पात्रता असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या शैक्षणिक जीवनात त्याने अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. त्याने आपले शालेय शिक्षण सेंट कोलंबियाच्या एका शाळेत पूर्ण केले आणि नंतर अर्थशास्त्र विषयात पदवी मिळविण्यासाठी तो हंसराज कॉलेजमध्ये गेला आणि त्यानंतर मास कम्युनिकेशनचा अभ्यास ही त्याने केला आहे. तथापि, त्याने नंतरचे पूर्ण केले नाही आणि अभिनयात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

3. जॉन अब्राहम

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाबॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याने ‘नरसी मोंजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ‘ या नामांकित कॉलेजमधून व्यवसाय प्रशासनात त्याची पदवी पूर्ण केली. त्यांचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले असून नंतर त्याने जय हिंद या कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली.

4. विद्या बालन

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाविद्या बालन हिने वयाच्या १६ व्या वर्षी ‘हम पांच’ या आयकॉनिक टीव्ही शोमधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता पण तरीही ती बॉलिवूडमधील सर्वात सुशिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. आणि चित्रपटात येण्यापूर्वी तीने मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी सुद्धा घेतली आहे.

5. आयुष्मान खुराना

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाआयुष्यमान खुरानाची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत चांगली आहे, ज्यामध्ये त्याने चंदीगडच्या DAV कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे. नंतर त्याने चंदीगडमधील स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडीजमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.

6. परिणीती चोप्रा

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

परिणीतीने युनायटेड किंगडममधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये तिहेरी सन्मान पदवी प्राप्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…

Maharashtra: ‘टेड टॉक’, ‘जोश टॉक्स’ नंतर आता टिचर्स टॉक्स; ग्रामीण भागातील शिक्षकांचा प्रेरणादायी ट्रेंड येणार!

Virat Kohli : ‘विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये?’ किवी कर्णधार केन विल्यमसनचे दिलखुलास उत्तर

7. वरुण धवन

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकाडेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा बॉलिवूडमधील सर्वात सुशिक्षित अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम ट्रेंट या विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे.

8. सारा अली खान

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंकासारा अली खाने तिच्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांची मने जिंकली आहेत, साराने तिचे शालेय शिक्षण बेझंट मॉन्टेसरी स्कूल, मुंबई येथे पूर्ण केले आहे. नंतर कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क येथे तिने इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी