25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनजॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत...

जॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…

बॉलिवूडमध्ये सुपरफ्लॉप ठरलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आता लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.
इटली येथे दौऱ्यावर असलेल्या जॅकलीन फर्नांडिसचे हॉलिवूड कलाकार जीन-क्लॉडसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. दोघंही चित्रपटाच्या चर्चेसाठी एकत्र बोलत असल्याचीही चर्चा रंगू लागल्या आहेत. बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट न देणाऱ्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं करियर हॉलिवूडमध्ये तरी बहरेल का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शुक्रवारी जीन क्लॉडने त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. जीन क्लॉडने पोस्टसह
जॅकलीन फर्नांडिससोबतचा फोटोही शेअर केला. “इटलीमधील धम्माल. तुम्ही फक्त अंदाज लावा” या कॅप्शनवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jean-Claude Van Damme (@jcvd)


जॅकलीन पांढऱ्या रंगाच्या टॉप, पांढरी पँट आणि निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये कमाल दिसत होती. अनेक सेलिब्रिटींनीही या दोघांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात नील नितीन मुकेश आणि सोनू सूद यांचाही समावेश आहे. वरुण धवनने पोस्टखाली एक विनोदी टिप्पणी देखील लिहिली. ‘लिजेंड. मी व्हॅन डॅमबद्दल बोलत आहे जॅकी.’ असं बोलत जॅकलीनला चिमटा काढला. फोटोत केवळ जीन-क्लॉड छान दिसत असल्याचं वरुणनं अप्रत्यक्षरित्या म्हटलं. यावर अजूनही जॅकलीननं प्रतिक्रिया दिलेली नाही.

जॅकलीन अक्षय कुमारसोबत आगामी ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रवीना टंडन, दिशा पटानी, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव आणि कृष्णा अभिषेक यांच्यासह गायक-बंधू दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांच्याही महत्वाचच्या भूमिका आहेत. मात्र जॅकेलीनच्या न्यायालयीन प्रकरणामुळे तिचं करियर संपलं. एरव्ही अक्षयच्या चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळायची. आता ‘वेलकम टू द जंगल’मध्ये जॅकलीनची जागा दिशा पटानीनं घेतली आहे.

हे ही वाचा 

55 वर्षांच्या दिप्ती भटनागरचे तरुणींना लाजवेल असे ‘सौंदर्य’

आता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !

काश्मीरच्या नदीत अंघोळ केलीस आता लग्न कधी करतोयस, चाहत्यांचा कार्तिकला थेट सवाल!

‘मिस श्रीलंका’चा किताब जिंकलेल्या अभिनेत्री जॅकेलीन फर्नांडिसची गेल्या दोन वर्षापासून २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ९ डिसेंबर २०२१ रोजी जॅकेलीन अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कडून चौकशी करण्यात आली. या घटनेनंतर फर्नांडिसला आगामी ‘द घोस्ट’ या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांची महत्वाची भूमिका आहे.

१७ ऑगस्ट २०२२ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या याच मनी-लाँडरिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले. २६ सप्टेंबर २०२२ रोजी जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून न्यायालयाने जॅकलीनला पन्नास हजार जामीनाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी