31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमनोरंजनजान्हवी कपूर पॉर्न चित्रपटात? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य

जान्हवी कपूर पॉर्न चित्रपटात? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य

हिट चित्रपट मिळण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून धडपडणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरनं स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. जान्हवीनं आपल्या किशोरवयीन वयातील मॉर्फ केलेली छायाचित्रे अश्लील पॉर्न संकेतस्थळावर स्वतः पहिल्याची माहिती दिली. अर्थात त्या फोटोत मी नव्हतेच पण केवळ सिनेकलाकारांच्या घराण्यात जन्म घेतल्यानं स्टारकिड्सला समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत तिनं दुःख व्यक्त केलं.

जान्हवी कपूर लहान असल्यापासूनच सिनेविश्वातचर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-अभिनेता बोनी कपूर यांची मोठी मुलगी असलेल्या जान्हवीला वयाच्या दहाव्या वर्षी पापाराझीनी पाहिलं. त्यावेळी याहूचं संकेतस्थळ इंटरनेट वापरासाठी प्रसिद्ध होतं. याहूवर सर्व लिंकवर माझे फोटो पाहून मी घाबरलेच, असं जान्हवी म्हणाली. वयाच्या दहाव्या वर्षी तुम्हांला नकळत मिळणारी प्रसिद्धी बालमनाला बरेचदा पोखरते. बालपणी मित्रपरिवार जोडताना मला बरेचदा स्टार कीड असल्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवत राहिलं. कित्येकदा मला मित्रमैत्रिणींकडून एका विशेष पद्धतीची अलिप्त वागणूक मिळायची. मला मैत्रीण म्हणून स्वीकारायला सर्वांनी बराच वेळ घेतला.

हा धक्का पचवत मोठं होत असताना मी माझे मोर्फ केलेले फोटो नकोत्या संकेतस्थळावर पाहिले. अर्थात याबद्दलची माहिती मला मित्रपरिवाराकडून मिळाली, अशी माहिती जान्हवीनं दिली. हा सर्व प्रकार केवळ स्टार कीड म्हणून लहानपणापासून सोसावा लागत असल्याची खंतही जान्हवीनं व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा 
विजय देवरकोंडाचं गर्लफ्रेंड रश्मिकाबद्दल मोठं वक्तव्य
मुलीने पडद्यावर चुंबन घ्यावे का; रविना टंडन म्हणाली…
गांधीजींचे विचार शिल्लक नाहीत, गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक

जान्हवी आपल्या चित्रपटांपेक्षाही खासगी आयुष्यातील घडामोडींसाठी चर्चेत असते. नुकतीच एका सार्वजनिक गणपती मिरवणुकीत जान्हवी दिसली होती. जान्हवीसोबत तिचा प्रियकर शिखरहीसोबत होता. जान्हवी आणि वरुण धवनच्या ‘बवाल’ चित्रपटात केवळ वरुणच्या अभिनयाची प्रशंसा झाली. जान्हवी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणूनही झळकली. मात्र गॉडफादर करण जोहर वगळता जान्हवीला कोणीच निर्माता फारसं काम देत नाही. त्यामुळे जान्हवी बरेचदा बॉयफ्रेंड शिखरसोबत कधी कर्नाटकातील मंदिरात तर कधी तिरुपती बालाजी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी दिसून येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी