29 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमनोरंजनगिरीजा ओकला बॉलीवुडमध्ये आले सुगीचे दिवस

गिरीजा ओकला बॉलीवुडमध्ये आले सुगीचे दिवस

जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड केलाय. चित्रपपटाची कथा सर्वांनाच आवडलीय. शाहरुख, नयनतारा यांच्यासह मराठमोळ्या गिरीजा ओक गोडबोलेनंही चित्रपटात चांगलाच भाव खाल्ला आहे. या चित्रपटतील भूमिकेमुळे गिरीजाला आता संपूर्ण देशात ओळख मिळालीये. गिरीजा आता तिच्या नव्या हिंदी चित्रपटासाठी सज्ज झाली असून, ती आगामी ‘द वेक्सीन वोर’ या चित्रपटात झळकणार आहे.

‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे विवेक अग्निहोत्री यांनी ‘द वेक्सीन वोर’चं दिग्दर्शन केलंय. तर पल्लवी जोशी सिनेमाची निर्माती आहे. पल्लवी विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे. ‘द वेक्सीन वोर’ चित्रपटात पल्लवी जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले महत्वाची भूमिका साकरत आहेत. याआधी पल्लवी जोशी यांनी ‘कश्मीर फाईल्स’मध्येही काम केले होते. पल्लवी जोशी, गिरीजा ओक-गोडबोले यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अनुपम खेर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

समाजातील सत्य घटनावर चित्रपट बनवण्याकडे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा कल असतो. काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर ‘कश्मीर फाईल्स’ सिनेमा बनवला गेला. कोरोनाकाळातील आरोग्य व्यवस्थेची विदारक स्थिती, आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हाने, कमी काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवण्याचे आव्हान या घटनांवर चित्रपट आधारला आहे. कोरोनाच्या संपूर्ण काळात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. डॉक्टर, संशोधक यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळताना घेतलेले अनुभव ‘द वेक्सीन वोर’ चित्रपटात मांडण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा 
‘ये दिल मांगे मोअर’… कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता धसका
भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?
खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक

चित्रपटात गिरीजा आरोग्य क्षेत्राशी संबंधित भूमिका साकारत आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच गिरीजानं दोन्ही चित्रपटातील भूमिकेत प्रचंड फरक असल्याचं सांगितलं होतं. मी आयुष्यात पहिल्यांदाच स्टंट सीन्स केलेत. शूटिंगनिमित्ताने मोठ्या आर्म गन्स आम्ही खांद्यावर ठेवून राहायचो. एके दिवशी बंदूकीच्या टांगत्या लोखंडामुळे मांडी काळीनिळी पडली. तरीही शूटिंगचा उत्साह कायम राहिला. त्याउलट ‘द वेक्सीन वोर’मधील भूमिका आहे. मी भूमिकेबद्दल फारसा तपशील देऊ शकत नाही. तुम्हांला चित्रपट पाहावा लागेल, असंही गिरीजानं सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी