30 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरमनोरंजनदणादण चित्रपट आपटल्यानंतर किंग खानचबद्दल 'या' अभिनेत्याची प्रतिक्रिया बदलली

दणादण चित्रपट आपटल्यानंतर किंग खानचबद्दल ‘या’ अभिनेत्याची प्रतिक्रिया बदलली

अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने सोमवार पर्यंत ३५० कोटीहून अधिक कमाई केली. ‘जवान’ चित्रपट लवकरच बाहुबलीच्या कमाईचाही विक्रम तोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘जवान’चं यश पाहून खिलाडी अक्षय कुमारनंही शाहरुख खानचं कौतुक केलं. माझ्या पठाण आणि जवानचं अभिनंदन. भारतीय सिनेमाची पुन्हा यशाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ‘जवान’चं यश खरं च कौतुकास्पद आहे, या शब्दात खिलाडी कुमारनं ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) शाहरुखचं अभिनंदन केलं.

शाहरुख सध्या ‘एक्स’वर फार सक्रिय आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख ‘एक्स’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्स आणि मित्रपरिवाराशी गप्पा मारताना दिसतोय. शाहरुखनं ओनमच्यावेळी चेन्नईत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करत ‘जवान’ चित्रपटाचं प्रमोशन केलं. याव्यतिरिक्त शाहरुख कोणत्याही रियालिटी शोमध्ये किंवा मुलाखतीतून चित्रपटाचं प्रमोशन करत नव्हता.’पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटासाठी केवळ सोशल मीडियाचा वापर केला गेला. चार वर्षांच्या ब्रेकनंतर यंदाच्या वर्षापासून शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ लागलेत. ‘पठाण’ने प्रदर्शनानंतर ४५० कोटीपर्यंतची कमाई केली. ‘जवान’ चार दिवसांत ३५० कोटीपर्यंत जाऊन पोहोचला.

दुसरीकडे वर्षाला चार सिनेमा प्रदर्शित करणाऱ्या अक्षय कुमारला प्रेक्षकांनी नाकारलंय. गेल्या तीन वर्षात अक्षयचे नऊ सिनेमे दणाणून आपटले. सनी देओलच्या ‘गदर २’नं अक्षय कुमारच्या ‘ओह माय गोड’चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग खेचला. ‘गदर२’नं चार आठवड्यातच ५२० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. ‘जवान’ चित्रपट ३५० कोटीहून जास्त कमाई करत असल्याचं चित्र स्पष्ट होताच अक्षय कुमारनं थेट ‘एक्स’वर एका खाजगी मनोरंजन वाहिनीने ‘जवान’ चित्रपटाबद्दल दिलेली माहिती पोस्ट केली. अक्षयनं अभिनंदन करताच शाहरुखनंही त्याच्या आगामी चित्रपटांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही सर्वांनी चित्रपटासाठी प्रार्थना केल्यानं यश मिळालं. तब्येतही सांभाळ, अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली.

हे सुद्धा वाचा 
मराठा आरक्षण: शिष्याच्या मदतीला धावला गुरू
जिनिलिया वाहिनी पुन्हा गरोदर?
ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर पटकाविला तिसरा क्रमांक

येत्या ६ ऑक्टोबरला अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ प्रदर्शित होतोय. अक्षयनं ७ सप्टेंबरला वाढदिवसानिमित्तानं ‘वेलकम३’ या मल्टीस्टारर चित्रपटाची घोषणा केली. हा सिनेमा पुढच्या वर्षी नाताळला प्रदर्शित होईल. सिनेमात अक्षयची एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि लारा दत्ता जॅकलीन फर्नांडिस असतानाही त्याला तिशीतल्या दिशा पटानीसोबत जोडी दिली गेलीये. अक्षय कुमार आणि दिशा पटानीची जोडी नेटिझन्सनं चांगलीच ट्रोल केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी