34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनJaya Bachchan : साडीबाबत जया बच्चन यांनी मांडले परखड मत

Jaya Bachchan : साडीबाबत जया बच्चन यांनी मांडले परखड मत

बॉलिवूडची मोठ्या पडद्यावरील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या बोलण्यावरून ट्रोल होत असतात. नात नव्या नवेली नंदाच्या अलीकडील पॉडकास्ट एपिसोडमध्ये, जयाने पुन्हा एकदा भारतीय महिलांच्या फॅशन सेन्सवर काहीतरी सांगितले, जे तुम्हाला कदाचित आवडणारही नाही आणि पटणार देखील नाही.

बॉलीवूड अभिनेत्री आणि बिग बी यांच्या पत्नी जया बच्चन नेहमीच त्यांची मते परखडपणे मांडत असतात आणि विशेषत: बऱ्याचवेळा त्यांनी निर्भयपणे मांडलेली मते ही वादग्रस्त असल्याने त्यांना लोकांकडून ट्रोल देखील करण्यात येते. जया बच्चन या एक मजबूत स्त्रीवादी आहे. तसेच योग्य आणि चुकीबद्दल बोलण्यास कधीही त्या संकोच करताना देखील नाही. जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या अलीकडील पॉडकास्ट एपिसोडमध्ये जया पुन्हा एकदा भारतीय महिलांच्या फॅशन सेन्सबद्दलची टिप्पणी केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आपल्या भारतीय कपड्यांपेक्षा पाश्चात्य कपड्यांना का प्राधान्य दिले जात आहे, हे मला समजत नाही, असे जया बच्चन यावेळी म्हणाल्या.

जया बच्चन पाश्चिमात्य कपड्यांना चांगले मानत नाहीत
भारतीय महिलांच्या पाश्चात्य कपड्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जया बच्चन म्हणाल्या की, ‘मला वाटतं की आम्ही नकळतपणे हे मान्य केले आहे की पाश्चात्य कपड्यांमुळे स्त्रीला पुरुषशक्ती मिळते. मला नारी शक्तीमध्ये स्त्री बघायला आवडेल. ‘जा साडी नेस’ असे मी म्हणत नाही. पण पाश्चात्य देशातही स्त्रिया छान कपडे घालत असत. जेव्हा त्याने पॅंट घालायला सुरुवात केली तेव्हा हे सर्वकाही खूप बदलले गेले.

नव्या नंदा म्हणते की, ‘साडी कम्फर्टेबल नाही’
या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ही सुद्धा उपस्थित होती. श्वेता बच्चन ही यावर लगेच प्रतिक्रिया देत म्हणाली की, काम करताना महिलांसाठी पाश्चात्य कपडे अधिक सोयीस्कर असतात. नव्याने सांगितले की, आज अनेक स्त्रिया केवळ घरातच नाहीत, बाहेर जात आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. एका साडीच्या तुलनेत शर्ट आणि पँन्ट घालणे हे अगदी सहज आहे.

हे सुद्धा वाचा

Hardik Pandya: हार्दिक पांड्या होऊ शकतो T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार

Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

Aditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य ठाकरेंचा सवाल

दरम्यान, याचवेळी नव्याने अशा काही सीईओ असलेल्या महिलांबद्दल संगीतले की ज्यांना आजही साडी घालायला आवडते. यावर जया बच्चन म्हणाल्या की, त्या महिला साडीमध्ये स्वत:ला सक्षम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटतात. जया बच्चन यांनी आपले मत मांडल्यामुळे त्या चर्चेचा विषय बनण्याची पहिलीच वेळ नाही. जया अनेक मुद्द्यांवर बोलल्या आहे. यापूर्वी, पॉडकास्टमध्ये नव्या नंदा हिने नातेसंबंध, मासिकपाळी (पीरियड्स) दरम्यान शूटिंग करताना येणाऱ्या अडचणी आणि इतर अनेक विषयांवर खुलासा केला होता. दरम्यान, जया बच्चन लवकरच आता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहे. जो पुढील वर्षी 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी