33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमनोरंजनजितेंद्र आव्हाडांनी थेट भाजपला आव्हान देत 'या' मराठी चित्रपटाचे मोफत शो लावलेत

जितेंद्र आव्हाडांनी थेट भाजपला आव्हान देत ‘या’ मराठी चित्रपटाचे मोफत शो लावलेत

सध्या संपुर्ण देशात कथित लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ वरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात भरसभेत या चित्रपटाबद्दल वक्तव्य केल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री केला जात आहे. एकीकडे भाजप नेते द केरल स्टोरी हा चित्रपट मोफत दाखवत असतानाच, आता भाजपला आव्हान देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मराठी चित्रपट मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे.

ठाण्यातील प्रभात टॉकीजमध्ये महाराष्ट्राचा शाहीर हा सिनेमा मोफत दाखवणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे. यापुर्वी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या खास शोचे आयोजन 7मे रोजी कांदिवलीतील एका थेअटरमध्ये केले होते. त्यामुळे आता राजकीय नेत्यांमध्ये चित्रपटावरुन आता फुकटची स्पर्धा लागल्याचे दिसून येते.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्राचा शाहीर चित्रपटाकडे नेतेमंडळींचं लक्ष नसल्याची खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केदार शिंदेंच्या ट्विटला उत्तर देत, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत असल्याचं जाहीर केलं. आम्ही ठाण्यात प्रभात टॉकिजला महाराष्ट्र शाहीर ह्या चित्रपटाचा शुक्रवार, शनिवार, रविवारी संध्याकाळी 7 वाजताचा शो लावला आहे. जाहीर आमंत्रण… मराठी वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा शो विनामूल्य आहे. आपले संस्कार, संस्कृति आणि इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा, असे ट्विट आव्हाड यांनी केल आहे.

केदार शिंदे यांचं ट्विट

“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असे ट्विट केदार शिंदे यांनी केले होते.

हे सुद्धा वाचा : 

द केरला स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फासावर…; जितेंद्र आव्हाड कडाडले

The Kerala Storyचा बॉक्स ऑफिसवर धुव्वा; वादग्रस्त ठरूनही करतोय कोटींची कमाई

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

Jitendra Awhad announced free shows of maharashtra shahir Marathi film in thane; challenged to BJP and the kerla story

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी