31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमनोरंजनशाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीझ; कमल हसन काय म्हणाला ?

शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीझ; कमल हसन काय म्हणाला ?

अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपपटाच्या प्रमोशनसाठी ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी पुढाकार घेतल्याचे बुधवारी चेन्नई येथील प्रमोशन कार्यक्रमात दिसून आले. कमल हसन यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शाहरुखला जवान चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. शाहरुखचा जवान हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमा हिंदी, तेलुगु आणि तामिळ भाषेत प्रदर्शित केला जाईल. सिनेमाच्या प्रमोशनसाठी बुधवारी शाहरुख चेन्नईला आला होता.

चेन्नईतील साईराम इंजिनियरिंग महाविद्यालयात शाहरुखखानचे आगमन झाल्यानंतर स्टेजवर ज्येष्ठ अभिनेते कमल हसनचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. या व्हिडिओबाबत कमालीची गुप्ताता पाळण्यात आली. अचानक स्टेजवरील स्क्रीनवर कमल हसन दिसू लागले. चेन्नईत किंग शाहरुख खानचं स्वागत आहे. मला आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती. काही कारणास्तव मला येणे शक्य झाले नाही. मला माझा मित्र, रोमान्सचा राजा शाहरुख खानला भेटायची फार इच्छा आहे, या शब्दानंतर कार्यक्रमात उपस्थित शाहरुखच्या फेन्सनी टाळ्यांच्या कडकडाटात कमल हसन यांना धन्यवाद दिले.

हे सुद्धा वाचा
राहुल गांधी 11 वर्षांनतर मुंबईत; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार
शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज
इंडियाच्या बैठकीत वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची मेजवानी

सिनेमा प्रदर्शनाला आठवडा उरला असला तरी अभिनेत्री नयनतारा कार्यक्रमाला दिसली नाही. नयनतारा आपल्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी सहभाग घेत नाही. शाहरुखच्या जवान चित्रपटासाठी नयनतारा प्रमोशनमध्ये सहभागी होईल, अशी चर्चा होते. ओनम सण साजरा करण्यासाठी नयनतारा कुटुंबीयांसमवेत होती. तीन दिवसांपूर्वीच नयनताराचे पती विघ्नेश शिवन यांनी ओनम सण साजरा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नयनतारा येत्या दिवसात प्रमोशनसाठी हजर राहील का, याबाबत अधिकृत माहिती शाहरुखच्या टीमने अद्यापही दिलेली नाही. रेड चिलीजची निर्मिती असलेला जवान हा चित्रपट अटली यांनी दिग्दर्शित केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी