31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमनोरंजनदीपिका पाडूकोणला 'या' कलाकारानं पाठवला मेसेज, दीपिकाची रिएक्शन काय?

दीपिका पाडूकोणला ‘या’ कलाकारानं पाठवला मेसेज, दीपिकाची रिएक्शन काय?

अभिनेता करणवीर बोहरानं नुकताच आपला 41 वा जन्मदिवस साजरा केला. 28 ऑगस्टला शूटिंगच्या सेटवर अभिनेत्यानं दणक्यात आपला वाढदिवस साजरा केला. हिंदी मालिकांमध्ये करणवीरची चांगलीच चलती आहे, मात्र त्याला हिंदी सिनेमांमध्ये फारसं यश लाभलं नाही. काही दिवसांपूर्वीच फरहानने ‘डॉन 3’ चित्रपटाची घोषणा केली. अभिनेता रणवीर सिंग ‘डॉन 3’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

करणवीरला आगामी ‘डॉन 3’ चित्रपटात काम हवंय. ‘डॉन 3’चे निर्माता फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांचा संपर्क क्रमांक करणवीरकडे नव्हता. अखेरीस करणवीर बोहरानं रणवीर सिंगची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला संपर्क करण्याचं ठरवलं.

याबद्दल करणवीर म्हणतो की, मला रणवीर सिंग च्या ‘डॉन 3’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारायची आहे. चित्रपटातील निर्मात्यांचा संपर्क क्रमांक माझ्याकडे नव्हता. मी थेट दीपिका पादुकोणला मेसेज करायचं ठरवलं. दीपिका मेसेजला प्रतिसाद देईल तर उत्तम, नाहीतर ठीक, असं ठरवून मी दीपिकाला मेसेज केला. मी तुला संबंधितांचा संपर्क क्रमांक देऊ शकत नाही. संपर्क क्रमांक देण्यासाठी मला मर्यादा आहेत.

हे सुद्धा वाचा 
राहुल गांधींना अदानी पावला…
‘मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार का ?’ याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान
बायकोच्या मानलेल्या भावावर आला ‘तसला’ संशय; अल्पवयीन मुलाची हत्या करुन घरातच लपविला मृतदेह

मी चित्रपटासाठी कलाकारांना निवडण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगू शकते, असा रिप्लाय खुद्द दीपिकाने करणवीरला केला. योगायोगाने संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक माझ्याकडे होता, असं करणवीरनं सांगितलं. ‘डॉन 3’साठी करणवीर ची निवड झाली की नाही, हे मात्र अद्यापही त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी