29 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमनोरंजनकरीना कपूरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन!

करीना कपूरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन!

अभिनेत्री करीना कपूर खान नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. गेल्या कित्येक महिन्यांपासून करीना कपूर खानच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आगमनाची चर्चा लागून राहिली होती. अखेरीस ‘जाने जा’ या वेबसिरीजच्या माध्यमातून करीना कपूर खाननं ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन केलं. मंगळवारी ‘जाने जा’ वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. करीनासह जयदीप अहलावत आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.

‘जाने जा’वेब सिरीजची कथा हिल स्टेशनवर राहणाऱ्या एका महिलेची आहे. करीना कपूर खानने माया डिसूजा नावाचं पात्र साकारलं आहे. कॅफे शॉप चालवणाऱ्या माया डिसूजावर खुनाचा संशय आहे. सिंगल मदर असलेली माया डिसूजा या चक्रव्युहातून आपली सुटका कशी करते, यावर वेब सिरीज आधारित आहे. ‘जाने जा’वेब सिरीजमध्ये जयदीप अहलावत कराटे प्रशिक्षक तर विजय वर्मा पोलिसाची भूमिका साकारत आहे.

हे ही वाचा 

…आणि शाहिद कपूर भावाच्या लग्नात संतापला !

कपूर घराणं ‘या’ व्यक्तीच्या आठवणीत बुडालं… सुनबाई आलियाला पडला विसर!

कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…

करीनानं इंस्टाग्रामवर ‘जाने जा’ वेब सिरीजचा ट्रेलर पोस्ट केला. करीनाच्या ओटीडी प्लॅटफॉर्मवर आगमनासाठी बहिण करिश्मा कपूर, नणंद सबा पतौडी यांनी शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनानंतर वेब सिरीज धमाल उडवून देईल, अशी आशा सबा पतौडीनं व्यक्त केली. ‘जाने जा’ही सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज येत्या २१ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स इंडिया वर प्रदर्शित केली जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी