26 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमनोरंजनतैमूर आणि जहांगीरला सांभाळणाऱ्या नॅनीला करीनाकडून मिळते अशी 'वागणूक'

तैमूर आणि जहांगीरला सांभाळणाऱ्या नॅनीला करीनाकडून मिळते अशी ‘वागणूक’

अभिनेत्री करीना कपूर खानने तैमुर आणि जहागीर या आपल्या दोन्ही मुलांना सांभाळणाऱ्या आयांना घरात चांगली वागणूक देत असल्याचं स्पष्ट केलं. तैमुर आणि जहागीरच्या जन्मापासून त्यांना आमच्या सोबतच आयांनी लहानाचं मोठं केलंय. समान वागणूक हा त्यांचा हक्क आहे, असं मत करीना कपूर खाननं एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
करीना कपूर आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमूर सात वर्षांचा आहे. लहान मुलगा जहांगीरला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झालीत. दोघांना लहानपणापासूनच आया सांभाळतात. तैमुर सहा महिन्यांचा असतानाच करीना पुन्हा शूटिंगमध्ये व्यस्त झाली. जहांगीर दोन वर्षाचा झाल्यानंतर करीना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतेय. नेटफ्लिक्सवर ‘जानेजा’या वेबसिरीजमध्ये करीनानं सिंगल मदरची भूमिका साकारलीये. ‘जानेजा’ वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी एका इंग्रजी दैनिकात दिलेल्या मुलाखतीत करीनानं मुलांच्या आयांसोबत नात्याबद्दल भाष्य केलं. तैमूरच्या जन्मानंतर आया फारशी आमच्यासोबत जेवायची नाही. डायनिंग टेबलवर सोबत जेवण तिला पसंत नव्हतं. एकदा तैमूरनंच नॅनी (आया) आपल्यासोबत जेवण का नाही अशी मला विचारणा केली. या घटनेनंतर आया आता आमच्यासोबतच जेवते. दोन्ही आयांना माझ्या मुलांनी सोबतच जेवणाचा आग्रह केला.
आमच्या गैरहजेरीत तैमुर आणि जहागीरला आया पूर्णवेळ सांभाळतात. त्या दोघींनाही पालकांएवढाच सन्मान मिळायला हवा. मी आणि सैफ सोबत असताना दोघींनाही कुटुंबातील सदस्यासारखी वागणूक देण्यावर आमचा कटाक्ष असतो. आम्ही सर्व बहुतेक वेळा एकत्र असतो आणि आम्ही एकत्र प्रवास करतो. ते माझ्या मुलांची त्यांच्या स्वतःसारखी काळजी घेतात, यासाठी मी दोघींचे आजन्म ऋणी राहीन, असंही करीनानं सांगितलं.
हे ही वाचा 
‘जाने जान’ वेबसिरीज येत्या २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. करीनाकडे दिग्दर्शक हंसल मेहता यांचा आगामी चित्रपट द बकिंगहॅम मर्डर्स देखील आहे. ‘द क्रू’मध्ये कपिल शर्माही एका खास कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. ‘द क्रू’ 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी