27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमनोरंजनकरीनाच्या 'द बकिंगहॅम मडर्स'ची चर्चा, लवकरच झळकणार 'मामी'मध्ये!

करीनाच्या ‘द बकिंगहॅम मडर्स’ची चर्चा, लवकरच झळकणार ‘मामी’मध्ये!

करीना कपूरच्या नेटफ्लिक्सवरील पदार्पणाच्या वेबसिरीज ‘जाने जान’ हिट ठरला. आता करीना ‘द बकिंगहॅम मडर्स’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. मुंबईत लवकरच सुरू होणाऱ्या ‘ मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हीग इमेज’ (मामी) फिल्म फेस्टिवल ची सुरुवातही या चित्रपटाने होणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे. हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘द बकिंगहॅम मडर्स’ने बीएफआय फिल्म फेस्टिवलमध्येही प्रशंसा मिळवली.

‘द बकिंगहॅम मडर्स’ च्या फर्स्ट लूक पोस्टर मध्ये करीनाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. या पोस्टरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी करिनाला पकडले आहे. चित्रपटात ॲश टंडन, रणवीर ब्रार आणि कॅट एलेन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघवर राज यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यासह स्वतः करिना कपूर देखील’द बकिंगहॅम मडर्स’ चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.


गेल्या वर्षी करीना कपूर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ प्रदर्शित झाला होता. आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘लालसिंग चड्डा’ दणाणून आपटला. अद्वैत चंदनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९९४ च्या हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.


दिल्लीतील एका मीडिया इव्हेंटमध्ये करिनाने अलीकडेच लाल सिंग चड्ढा यांच्या अपयशाची कबुली दिली. लाल सिंग चढ्ढा हा एक अप्रतिम चित्रपट होता.आमिरसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा भाग असल्याचा मला खरोखर अभिमान आहे. आमीर बॉलीवूडमधला हुशार अभिनेता आहे. लाल सिंग चढ्ढा तुम्ही 20 वर्षांनंतही तुम्ही सहजतेने पाहू शकाल, असे करीना म्हणाली.

हे ही वाचा 

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

प्रभासच्या ‘सलार’मध्ये राणी मुखर्जीच्या हिरोची एन्ट्री

आमिरने नेहमीच त्याच्या भूमिकांमध्ये प्रयोग केले आहेत. तो नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयोगशील स्क्रिप्टमध्ये 100% यशाची शक्यता नसते, असेही करीनाने सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी