अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काश्मीरमधील थंड वातावरणात चक्क नदीत गारेगार पाण्यात कार्तिकनं अंघोळ केली. चक्क गारठवणाऱ्या तापमानात थंड नदीत आंघोळ करताना कार्तिकनं अजिबात रडारड केली नाही. उलट कार्तिकनं जिद्दीनं थंड पाण्यात आंघोळ करण्यासाठी पुरेसा वेळ घेतला.
कार्तिकचं यंदाच्या वर्षात मजबूत शेड्युल व्यस्त आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कार्तिकचा ‘सत्य प्रेम की कथा’ या सामाजिक विषयावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या बायकोवर पूर्व प्रियकराने बलात्कार केल्याचं समजताच तिच्यासाठी कार्तिक लढतो असं चित्रपटाचं कथानक आहे. कार्तिकच्या या भूमिकेची सर्वांकडून प्रशंसा झाली. खुद्द कार्तिकनंही त्याच्या गेल्या दहा वर्षांतील करियरमधील हा सर्वात चांगला परफॉर्मन्स असल्याचं कबूल केलं. गेल्याच वर्षी कार्तिकला ‘भूलभुलय्या २’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. यंदाच्या वर्षीही कार्तिक ‘सत्य प्रेम की कथा’ साठी पुरस्कार पटकावण्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटानंतर कार्तिक तातडीने ‘चंदू चॅम्पियन’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त झाला.
View this post on Instagram
या सिनेमाचं पाहिलं शेड्युल लंडनमध्ये पार पडलं. काश्मीरमध्ये कार्तिकनं पहिल्यांदाच या चित्रपटासाठी ऍक्शन सीन्स केलेत. या शूटिंगमध्ये कार्तिकला अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. कार्तिकनं सरळ नदीतच उडी मारत थंड पाण्यात अंघोळ केली. खुद्द कार्तिकनंच थंड पाण्यात आंघोळ करून मी माझी बकेट लिस्ट मधील इच्छा पूर्ण केल्याचं इंस्टाग्रामवर सांगितलं. नदीतील अंघोळीचा व्हिडिओही कार्तिकनं पोस्ट केला. कार्तिकच्या या व्हिडिओला बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या. आता कार्तिकच्या बकेट लिस्टमध्ये अजून काय बाकी आहे, असा प्रश्नही अनेकजणांनी त्याला इंस्टाग्रामवर विचारला.
हे ही वाचा
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचं रिसेप्शन होणार मुंबईत; तारीख देखील ठरली !
जान्हवी कपूर पॉर्न चित्रपटात? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य
कार्तिकची लग्न करण्याची बकेट लिस्ट कधी पूर्ण होतेय असा प्रश्नही आता नेटीझन्स विचारत आहेत. यावर कार्तिककडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.