कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियनचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. फोटोत पिवळ्या जर्सीत केस विखूरलेल्या अवस्थेत कार्तिक चालताना दिसून येत आहे. चेहऱ्यावर चिडलेले हावभाव पाहून कार्तिकच्या चाहत्यांना चिंता वाटली. एरव्ही सतत चेहऱ्यावर हास्य जपणाऱ्या कार्तिकlला रागावलेले पहिल्यानंतर शूटिंग व्यवस्थित सुरु आहे ना, शूटिंगदरम्यान ऍक्शन सीनमुळे कार्तिक स्वतःच्या भूमिकेत असावा असा तर्क कार्तिकच्या चाहत्यांनी मांडला.
यंदाच्या वर्षी कार्तिकच्या ‘सत्य प्रेम की कथा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल दाखवली. कार्तिकचा आतापर्यंतचा सर्वात चांगला अभिनय ‘सत्य प्रेम की कथा’ चित्रपटात दिसून आला, या शब्दांत चित्रपट समीक्षकांनी त्याची प्रशंसा केली. या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची घोषणा केली. कार्तिक तातडीने चित्रपटाच्या शूटिंगसाठी रुजू झाला. चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याचे शूटिंग लंडन तर दुसऱ्या टप्प्याचे शूटिंग काश्मीर येथे पार पडले. काश्मीरमध्ये मोठा ऍक्शन सीन पार पडल्यानंतर थंड पाण्याच्या नदीत कार्तिक अंघोळ करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरला झाला.
Leaked Pic of #KartikAaryan from #ChanduChampion ?? pic.twitter.com/sfCLhkPDvJ
— Movie_Reviews (@Movie_reviewsss) October 14, 2023
‘चंदू चॅम्पियन’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, असे सुरुवातीला सांगण्यात आले. हा चित्रपट आयुष्यातील कथेवर आधारित आहे. मात्र, चित्रपटाचे कथानक गुपित ठेवण्यात आले आहे. दिग्दर्शक कबीर खानने ‘चंदू चॅम्पियन’ देशासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या अज्ञात नायकाबद्दल असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा
कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!
माहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ
फिटनेस फ्रिक बिपाशासोबत मुलगी देवीही करते योगा
काही दिवसांपूर्वी कार्तिकने हातात बंदूक धरत सैनिकी गनवेषातील फायरिंगचा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. या फोटोला खूप लाईक्स मिळाले. चित्रपटात ऍक्शन सीन्स असल्याने नक्की चित्रपटाची कथा खेळावर आधारित आहे की भारतीय सैन्यावर हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ‘चंदू चॅम्पियन’ला साजिद नाडियादवाला यांच्या नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट (NGE)ने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे.