31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमनोरंजनकॅटरीना-विकी कौशलची पहिली एनिवर्सरी; विकीने केले खास फोटो शेअर

कॅटरीना-विकी कौशलची पहिली एनिवर्सरी; विकीने केले खास फोटो शेअर

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ ही जोडी गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकली. आज त्यांच्या लग्नाची पहिली एनिवर्सरी साजरी केली

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ ही जोडी गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकली. आज त्यांच्या लग्नाची पहिली एनिवर्सरी साजरी केली. विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांनी गेल्यावर्षी राजस्थान मधील सवाई माधवराव जिल्ह्यातील चौथ का बरवरा येथे शाही विवाह सोहळ्यात विवाहबंधनाचे सात फेरे घेतले.  विकी कौशल आणि कॅटरीना सध्या आपल्या सहजीवनाचा आनंद लूटत आहेत. त्यांचे चाहते देखील त्यांच्या लव स्टोरीला शुभेच्छा देत आहेत.

लग्नाच्या पहिल्या एनिवर्सरीनिमित्त विकी आणि कॅटरीनाने दोघांच्या नात्याबद्दल एक मेसेज आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विकी कौशलने लिहिली आहे की, ‘’काळ सरत आहे, पण हा काळ सरत आहे मात्र तो तुझ्यासोबत खुपच जादूईपद्धतीने सरत चाललाय माझे प्रिये. तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तु कल्पनाही करु शकत नाहीस इतके मी तुझ्यावर प्रेम करतो.’’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


विकी आणि कतरीनाच्या चाहत्यांनी देखील या दोघांना खुप शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका चाहत्याने तुमचा फोटो पाहून माझे माझे हृदय पाघळून गेलय अशी कंमेंट केली आहे. तर विकी कौशल यांच्या वडिलांनी देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘’हॅप्पी एनिवर्सरी, माझे आशिर्वाद कायमच तुझ्यासोबत आहेत पुत्तर’’  तर कॅटरीनाने देखील विकीच्या या पोस्टवर सहजीवनच्या एक वर्षाच्या शुभेच्छा देत विकीला माझा प्रकाश किरण असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा
बुलेट ट्रेनसाठी 20 हजार कांदळवनाची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

VIDEO: ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

एअर इंडियाचा होणार कायापालट; खर्च होणार तब्बल 3300 कोटी

दरम्यान विकी कौशलचा गोविंदा मेरा नाम हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कॅटरीना देखील सध्या विजय सेतूपतीसोबत मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. कॅटरीना आणि विकी कौशलने गेल्या वर्षी त्यांच्या सहजीवनाला सुरुवात केली. हे दोघे ही त्यांच्या जीवनातील आनंदी क्षण व्यतीत करत असून दोघांनी एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अतिशय रोमॅंटिक शुभेच्छा दिल्या आहेत. विकी कौशल आणि कॅटरीना या दोघांच्या चाहत्यांनी देखील त्यांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

विकी कौशलच्या इन्टाग्रामवरील पोस्टवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री मुक्ती मोहन, गायिका नेहा कक्कर, प्रसिद्ध टीव्ही होस्ट मीनी माथुर, अभिनेत्री इलियाना डिक्रूज, चित्रपट दिग्दर्शक शशांक खेतान, अभिनेत्री सोफी चौधरी, गायिका निती मोहन, फिल्म प्रोड्यूसर रोनी लाहिरी अशा अनेक सेलिब्रिटीजनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!