31 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरमनोरंजनअरेव्वा: केरळच्या नववधूने लग्नाच्या दिवशीच लॅबकोट घालून दिली परीक्षा..!

अरेव्वा: केरळच्या नववधूने लग्नाच्या दिवशीच लॅबकोट घालून दिली परीक्षा..!

आधी लगीन कोंढण्याचे म्हणत केरळच्या या वधूने तिच्या लग्नाच्या साडीवर प्रयोगशाळेचा कोट परिधान करत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजेरी लावली आहे. ह्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला असून नेटिझन्सकडून तिच्या धाडसाचे खूप कौतुक करण्यात येत आहे.

सध्याच्या आधुनिक युगामध्ये स्त्री शिक्षणाचे महत्व हे काही नव्याने सांगायला नकोत.. आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आसणाऱ्या स्त्रीनं समाजात उच्च शिक्षणात रुची दाखवून प्रामाणिक कर्तुत्व पार पाडत समाजकार्यांत नाव लौकिक मिळवला आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये शिक्षण हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हाच विषय आपल्यासमोर दक्षिण भारतात राहणाऱ्या एका नववधूने मांडला आहे. (kerala Bridal wear lab coat over saree to attend practice test on her wedding day!)

शिक्षणाचे महत्त्व सांगत तसेच आधी लगीन कोंढण्याचे असे म्हणत केरळच्या या वधूने तिच्या लग्नाच्या साडीवर प्रयोगशाळेचा कोट परिधान करत आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजेरी लावली आहे. ह्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला असून नेटिझन्सकडून तिच्या धाडसाचे खूप कौतुक करण्यात येत आहे.

श्री लक्ष्मी अनिल नावाची नववधू ही बेथनी नवजीवन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची विद्यार्थिनी आहे. केरळच्या या नववधूने परिधान केलेल्या चमकदार पिवळ्या रंगाच्या साडीवर तीने घातलेल्या वजनदार दागिन्यांमध्ये ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “मेडिकोचे जीवन. एकाच दिवसात परीक्षा आणि लग्न,” असे व्हिडिओचे कॅप्शन लिहीत शेअर करण्यात आले आहे.

एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, वधू परीक्षा केंद्राकडे जाताना तिच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा अभ्यास करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे क्लिपच्या शेवटी, वधू परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना, तिच्या आईला मिठी मारून तिच्या लग्नाच्या ठिकाणी निघताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून, दोन्ही व्हिडिओंना दोन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि संख्या अजूनही वाढत आहे. सर्व स्तरांतून या नववधूचे कौतुक देखील होत आहे.

हे सुद्धा वाचा : कूल कॅप्टनला लागले शेतीचे वेड; एमएस धोनीचा हा अवतार पाहिलात का?

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी