29 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमनोरंजनShah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

Shah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

प्रसिद्ध व दिग्गज भारतीय अभिनेता आणि निर्माता शाहरुख खानला रेड सी, सौदी अरेबियामधील जेद्दाह शहरात फेस्टिव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात चित्रपट उद्योगातील असामान्य योगदानाबद्दल सन्माननीय पुरस्कार प्रदान केला जाईल.

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्याच्या लोकप्रियतेची सीमा नाही, जगभरात तो एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या किंग खानच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. आगामी ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये त्याचा गौरव करण्यात येणार आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलने आज जाहीर केले की, प्रसिद्ध व दिग्गज भारतीय अभिनेता आणि निर्माता शाहरुख खानला रेड सी, सौदी अरेबियामधील जेद्दाह शहरात फेस्टिव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात चित्रपट उद्योगातील असामान्य योगदानाबद्दल सन्माननीय पुरस्कार प्रदान केला जाईल.

प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह असून, जगातील सर्वात यशस्वी फिल्मस्टार्स पैकी एक आहे. चित्रपट उद्योगात तीन दशकांहून अधिक काळात शाहरुख खानने प्रेक्षकांचे मनोरंजन करत भारतात आणि जगभरात एक विलक्षण कारकीर्द निर्माण केली आहे. त्याच्या प्रयत्नांसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशंसा देखील मिळवली आहे. शिवाय, त्याचा सेल्फ मेड स्टार बनण्याचा प्रवास सर्वांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
रेड सी आयएफएफचे सीईओ मोहम्मद अल तुर्की म्हणाले, “आम्ही एक उल्लेखनीय प्रतिभा आणि जागतिक सुपरस्टार शाहरुख खानचा सन्मान करताना आनंदी आहोत. शाहरुख ने सुरुवातीच्या कामगिरीपासूनच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आणि आज काम करणाऱ्या जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षांनंतर, शाहरुख खान भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी सुपरस्टार्सपैकी एक आहे आणि जगभरातील रसिकांकडून त्याला पसंती मिळते. या डिसेंबरमध्ये जेद्दाहमध्ये त्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

हे सुध्दा वाचा

Shraddha Walker murder : श्रद्धा हत्याकांडासारख्याच भारतातील काही ह्रदयद्रावक घटना तुम्हाला माहिती आहेत का?

Indian Army Recruitment 2022 : विनापरीक्षा भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी! वाचा सविस्तर

Film Actress Died : मनोरंजन क्षेत्राला अखी एक झटका! 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

शाहरुख खान म्हणाला की, “रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून हा पुरस्कार मिळाल्याने मला खरोखरच सन्मान वाटतो. सौदी आणि त्या प्रदेशात माझ्या चाहत्यांमध्ये येणे विशेष आहे जे माझ्या चित्रपटांचे समर्थक आहेत. मी येथील प्रतिभा साजरी करण्यास आणि या रोमांचक चित्रपट समुदायाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे.”
शाहरुखचा आगामी चित्रपट ‘पठाण’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ज्याने प्रेक्षकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला आहे. तसेच, अभिनेता सध्या जेद्दाहमध्ये राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आहे, जिथे त्यांना सर्वत्र स्पॉट केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत बोमन इराणी देखील आहेत. या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खानने केली असून हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्षित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी