29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमनोरंजनKishore Kumar : सुपर कलाकार किशोर कुमार सुद्धा होते बाथरुम सिंगर

Kishore Kumar : सुपर कलाकार किशोर कुमार सुद्धा होते बाथरुम सिंगर

किशोर कुमार हे एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व होतं. किशोर कुमार जिव ओतून गाणे म्हणायचे. किशोर कुमारांनी अनेक मैफिली सजवल्या.

अनेक जण बाथरुममध्ये गाणं गुणगुणतात. सुपर गायक किशोर कुमार यांना देखील बाथरुमध्ये गाणं म्हणायची सवय होती. सचिन देव बर्मन यांनी त्यांना बाथरुमध्ये सेहेगल यांचे गाणं गुणगुणतांना ऐकलं आणि तिथेच त्यांच्या गाण्याला दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ते सुपर कालाकार ठरले. ” तुम से प्यार कितना”, “मेरे नैना सावन भादों” ही गाणी आजरामर करणाऱ्या गायकाचा आज जन्म दिवस आहे. कालाकार हा कलाकर असतो. काही माणसांकडे कला ही जन्मजात असते.‍ सुंदर अभिनय आणि सुंदर पार्श्वगायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार म्हणजे किशोर कुमार.‍

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1992 मध्ये मध्य प्रदेशमधील खांडवा येथे बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील पेशाने वकील होते. त्यांच्या आईचे नाव गौरीदेवी होते. अनुप कुमार आणि अशोक कुमार हे दोन भाऊ आणि सतीदेवी त्यांची बहिण होती. अशोक कुमार यांना पार्श्व गायनासाठी 8 फ‍िल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी “मरनेकी की दुआंए क्यो मांगू” हे गाणे गायले. त्यांनी मुसाफ‍िर, नौकरी, आंदोलन, पडोसन, नई दिल्ली, आशा, शराबी, अगर तुना होते, नमक हलाल, डॉन, आराधना आशा शेकडो चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले.

60 च्या दशकातील देवआनंदपासून 80 च्या दशकातीली अन‍िल कपूर यांच्यासाठी त्यांनी गाणी गायली. तल्लीन होऊन गाणारा गायक अशी‍ किशोर कुमार यांची ओळख आहे. किशोर कुमार जिव ओतून गाणे म्हणायचे. किशोर कुमारांनी अनेक मैफिली सजवल्या.किशोर कुमार बारा वर्षांचे असतांना रेडिओवर गाणे ऐकून थ‍िरकत होते.  ते घरी आलेल्या पाहुण्यांसमोर गाणे गाऊन त्यावर नाच करत. त्यांना आलेले पाहूणे बक्षीस देखील देत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. त्या काळात चित्रपट‍ात अभ‍िनयाबरोबरच गाता येणे देखील आवश्यक होते. त्यांच्या दोन्ही भावांनी चित्रपटात प्रवेश केला होता. १९५० मध्ये आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी क‍िशोर कुमार यांना मुकददर या चित्रपटामध्ये काम दिले. त्यामध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली.

सुद्धा वाचा

Sanjay Raut :संजय राऊत प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा नाही

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Phulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी “खासदार” कशी बनली ?

त्यानंतर 1951 मध्ये किशोर कुमार यांनी मन्नाडे यांच्यासह अनेक गाणी गायली. 1952 ते 1960 दरम्यान किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. “अधिकार”, “धोबी डॉक्टर”, “इल्जाम”, “मिस माला”, “नोकरी”, हे चित्रपटात त्यांनी 1954 मध्ये केले. 1956 मध्ये नऊ चित्रपटांत त्यांनी अभ‍िनय केला. आपल्या विनोदी स्वभावाने त्यांनी रसिकांची मने जिंकली. नाच, गाणे आण‍ि अभ‍िनय या कला त्यांना जन्मजात अवगत होत्या. त्यांनी मीन कुमारी, वैजयंती माला, निम्मी, काम‍िनी कौशल, मधुबाला, नुतन, माला सिन्हा, बिना रॉय इत्यादी नाय‍िकाबरोबर काम केले.”मेरा नाम अब्दुल रहमान”, “नखरे वाली कुंएँ”, “कुद जाना यार पर शादी मत करना”, “इना मीन डिका”, “हम तो मोहब्बत करेगा”, “पाच रुपया बारा आणा” अशी किशोर कुमार यांनी अनेक गाजलेली गाणी आहेत.

एक दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक सचिन देव बर्मन आले. त्यावेळी किशोर कुमार बाथरुमध्ये गाणे गात होते. सचिनदेव बर्मन यांनी विचाारले “‍कौन गा रहा है?” त्यावेळी संगितकार सचिनदेव बर्मन हे यशाच्या शिखराव‍र होते. त्यांनी किशोर कुमार यांची कला ओळखली. त्यांनी किशोर कुमार यांनी नक्कल न करण्याचे सांगितले. त्यानंतर किशोर कुमार यांच्या गळयातून सुमधूर गीतांचा झराच वाहू लागला. त्याची गाणी अजरामर झाली. गायक किशोर कुमार हे चित्रपट निर्माते झाले, दिग्दर्शक झाले. त्यांनी चित्रपटासाठी संगीतही दिले.

“चलती का नाम गाडी”, “बढती का नाम दाढी”, “जमीन”, “दूर का राही”, “झुमरु” आदी चित्रपट किशोर कुमार यांनी दिग्दर्शन केले. ते भारतीय पार्श्वगायक, गायक, अभ‍िनेता, पटकथा लेखक होते. त्यांनी हिंदी, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, ऊर्दू यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. किशोर कुमार यांची खरे नाव आभास कुमार गांगुली असे होते. त्यांनी चार लग्ने केली होती. त्यांचे पहिले लग्न रुमा गुहा यांच्या सोबत १९५० ते १९५८ झाले. त्यानंतर मधुबाला बरोबर १९६० ते १९६९, तर योगीता बाली १९७५ ते १९७८ यांच्या बरोबर त्यांनी लग्न केले. शेवटचे लग्न लीना चंदावरकर यांच्या बरोबर १९८० ते १९८७ मध्ये झाले. त्यांना दोन मुले आहेत. अमित कुमार, सुम‍ित कुमार. के.एल. सैगल यांची नक्कल करत ते गाणं शिकले.

‘आके सिधी लागी दिल पे’ हे हाप टिकिट या चित्रपटामधील गाणे संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांना युगल गीत हवे होते. किशोर कुमार आणि लता मंगेशकर हे गाणे गाणार होते. मात्र लता मंगेशकर बाहेर गावी गेल्या होत्या. त्यांना येण्यासाठी उशीर होणार होता. त्यावेळी त्यानी मेल‍ आणि फ‍िमेल दोन्ही गाणी त्यांनी गायली. किशोर कुमार यांनी स्वत:ची शैली विकस‍ित केली. त्यामध्ये योडेलिंगची वैशिष्टये होती. ती त्यांनी “टेक्क्स मोर्टन” आणि “जिमी रॉजर्स”च्या रेकॉर्डवर ऐकली होती. संगीतकार सी.रामचंद्र यांनी किशोर कुमार यांच्या गायकीला दादा दिली. १९६६ नंतर त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर ते आयकर समस्येमध्ये अडकले होते.

किशोर कुमार यांनी राजेश खन्नांसाठी 245, जितेंद्रसाठी 202, देव आनंदसाठी 119 अमिताभ यांच्यासाठी 131 गाणी गायली. “हमे तुम से प्यार कितना”, “मेरे नैना सावन भादों” ही त्यांची गाणी आजही गुणगुणावीशी वाटतात. त्यांनी आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर देखील गाणी गायली. १९६९ पासून आयकर थकबाकीसाठी त्यांनी स्टेज शो केले. २४ जानेवारी १९९८१ मध्ये दुपारी कोलकाता येथे हृदयविकाराने त्यांचा देहांत झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी