34 C
Mumbai
Monday, December 4, 2023
घरमनोरंजन१७ वर्षांच्या क्रिशा चंदाने पटकावला मिस इको टीन सौंदर्य स्पर्धेचा मुकुट

१७ वर्षांच्या क्रिशा चंदाने पटकावला मिस इको टीन सौंदर्य स्पर्धेचा मुकुट

मिस इको टीन  सौंदर्य स्पर्धेचा (Miss Eco Teen) मुकुट १७ वर्षांच्या क्रिशा चंदाने (Chrisha Chanda) जिंकत आज (दि.18) इतिहास रचला. गुरूग्राम येथील क्रिशा चंदाला 2021 साली मिस इको टीन चा किताब पटकवेली व्हिएतनामची बीला वू (Beela Vu) हिने मिस इको टीनचा मुकुट घातला.

मिस इको टीनचे मुख्यालय इजिप्त असून ही एक जागातील सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेतील २५ सौंदर्यवतींमधून क्रिशाची निवड झाली. क्रिशाने 2021 सालच्या मीस टीन दिवा स्पर्धेचा रनर अप किताब पटकावला होता. भारताकडून ती मिस इको टीन स्पर्धेसाठी सहभागी झाली होती. ही एक जागतिक स्पर्धा असून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढविणे आणि पर्यावरण विषयक विविध उपक्रमांध्ये देखीस सहभागी होते. या स्पर्धेच्या विजेत्याला युएनईपीमध्ये सहभागी होण्याची संधी देखील दिली जाते.

क्रिशा चंदाने या स्पर्धेसाठी गौरव गुप्ता आणि प्रेस्टो कॉउचर यांनी डिझाइन केलेला पोशाख परिधान केला होता. क्रिशा चंदा अॅक्ट नाऊ या एनजीएमध्ये देखील सक्रीय राहिलेली आहे. ही एनजीओ 160 हून अधिक देशांमध्ये पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित असते. क्रिशा ही सध्या 12 वी मध्ये शिकत असून ती विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. ती पर्यावरण विषयक उपक्रम आणि गरजू व्यक्तींसाठी मदत करत असते. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसह अॅक्ट नाऊद्वारे आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेतही ती वक्ता म्हणून सहभागी झाली होती.

हे सुद्धा वाचा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 1000 हून अधिक शिक्षकांची भरती करणार

या स्पर्धेचा मुकुट पटकविल्यानंतर क्रिशा म्हणाली, भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. देशासाठी यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही. मी हा क्षण कधीही विसरू शकत नाही. या स्पर्धेच्या माझ्या मला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या सर्व मार्गदर्शकांचे खूप खूप आभार मानते. माझे आई-वडील मला सतत प्रोत्साहन देत आले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी