बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या मोठ्या पडद्यावर एका नंतर एक सुपरहिट चित्रपटात काम करत आहे. तिचे चित्रपट प्रेषकांना फार आवडत असून, आता अभिनेत्रीने एक मोठी माहिती दिली आहे. क्रितीने सांगितले की, तिच्या एका चित्रपटाचे सिक्वेल बनणार आहे. तसेच त्याच्या स्क्रिप्टवर काम देखील सुरु करण्यात आले आहे. हा चित्रपट आहे ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’. (kriti sanon share update on teri baaton mein aisa uljha jiya sequel)
जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार ‘भूल भुलैया 3’ चा टीझर
‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये क्रितीने रोबोटची भूमिका केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात मानव आणि रोबोट यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली होती. तथापि, चित्रपट एका टप्प्यावर संपला जिथे त्याच्या दुसऱ्या भागाची शक्यता खुली राहिली. (kriti sanon share update on teri baaton mein aisa uljha jiya sequel)
मात्र, अलीकडेच क्रिती सेननने ‘तेरी बातों में उल्झा जिया’नंतर पुन्हा शाहिद कपूरसोबत काम करण्याबाबत चर्चा केली. ‘तेरी बातों में उल्झा जिया’च्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. या चित्रपटाच्या सिक्वेलचे लेखन सध्या सुरू आहे. ती आणि शाहिद लवकरच तयार होणाऱ्या सिक्वेलसाठी खूप उत्सुक आहेत. (kriti sanon share update on teri baaton mein aisa uljha jiya sequel)
अभिनेत्री दिव्या सेठवर कोसळला दुःखाचा डोंगर, 24 वर्षाच्या मुलीचे झाले निधन
यासोबतच क्रिती सेनननेही शाहिद कपूरसोबत ‘तेरी बातों में उल्झा जिया’मध्ये काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की शायदसोबत काम करणे तिच्यासाठी आनंददायी होते आणि आता तिला विश्वास आहे की त्यांच्यातील केमिस्ट्री उत्कृष्ट होती. क्रिती म्हणते की शाहिद अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांच्यासोबत तिची जोडी आणि केमिस्ट्री चांगली दिसते. (kriti sanon share update on teri baaton mein aisa uljha jiya sequel)