25 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमनोरंजनLayBhari Exclusive : 'टिकली लावावी की नाही, हे तिसऱ्याने सांगण्याची आवश्यकता नाही!';...

LayBhari Exclusive : ‘टिकली लावावी की नाही, हे तिसऱ्याने सांगण्याची आवश्यकता नाही!’; अभिनेत्री अनिता दाते हिची प्रतिक्रिया

अभिनेत्री अनिता दाते हिने 'लय भारी' शी साधलेल्या विशेष संवादात महिलांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना अनिका म्हणाली की, "मी टिकली लावावी की नाही हा माझा निर्णय आहे.

संभाजी भिडे यांनी महिलांच्या टिकली बाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. अनेक महिला संघटनांनी देखील त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणात भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील महिलांनी देखील या विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणात मराठी मालिकेतील राधिका म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘अनिता दाते’ हिने ‘लय भारी न्यूज’शी संवाद साधत विशेष प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

Shivsena Leader Murder : भरदिवसा शिवसेना नेत्याची हत्या! अज्ञातांकडून गोळीबार

SSC & HSC Exam Updates : विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी मिळाली मुदतवाढ

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

अभिनेत्री अनिता दाते हिने ‘लय भारी’ शी साधलेल्या विशेष संवादात महिलांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना अनिका म्हणाली की, “मी टिकली लावावी की नाही हा माझा निर्णय आहे. माझी इच्छा असेल, माझ्या कपड्यांवर सूट होणार असेल आणि माझी भुमिका असेल तर मी टिकली लावेल नाहीतर नाही लावणार. आणि मी टिकली लावावी की नाही लावावी हे कोणा तिसऱ्या माणसाने मला सांगण्याची आवश्यकता वाटतं नाही. टिकलीच्या संदर्भातील निर्णय हा पूर्णपणे स्त्रीचा वैयक्तिक निर्णय असायला हवा.”

LayBhari Exclusive : 'टिकली लावावी की नाही, हे तिसऱ्याने सांगण्याची आवश्यकता नाही!'; अभिनेत्री अनिता दाते हिची प्रतिक्रिया

पुढे बोलताना अनिता म्हणाली की, “मी कुठल्याही धर्माची असो. मी हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो किंवा ईसाई असो मी कोणत्याही धर्माची असली तरी टिकली लावयची की नाही, गळ्यात मंगळसूत्र घालायचे की नाही, अंगावर कोणते कपडे घालायचे हा त्या स्त्रिचा वैयक्तिक निर्णय असायला हवा. बाकी कोणाही तिच्यावर बंधने लादू शकत नाही.”

दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील अनिता दाते हिने रंगवलेलं ‘राधिका’ हे पात्र घराघरात पोहोचले. या पात्रातून एक स्वावलंबी स्त्री स्वतःच्या हिमतीवर जग जिंकण्याची हिंमत बाळगते असा संदेश देण्याच प्रयत्न केला होता. त्या पात्राप्रमाणेच अनिता हिने स्त्रीयांना अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे आणि त्यावर कोणीही गदा आणू शकत नाही अशी भुमिका घेत समाजात एक नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!