28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनमाधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीच्या लहान मुलाने, म्हणजेच रेयान याने आपली उदारता दाखविली आहे. रेयान याने आपले लांबसडक केस कापत ते कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी दान केले आहे. आपल्या मुलाच्या कामगिरीवर गर्व करत माधुरीने एक छानशी पोस्ट लिहिली आहे (Madhuri Dixit shared her son Ryan’s video).

राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त रेयान याने आपले केस कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी दान केले आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना पाहून रेयानला वाईट वाटते, या आजारात ती लोकं आपली केस गमावतात. म्हणून रेयान याने कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयावर एक पालक म्हणून आम्हाला आनंद झाला आहे. अशी पोस्ट माधुरीने लिहीली आहे.

‘बिग बॉस चा घरातून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली मोठी घोषणा

एकता कपूर, करण जोहर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; सोमवारी होणार पुरस्कार प्रदान सोहळा

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीने भावनिक पोस्ट लिहीत रेयानचा केस कापलेला व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. रेयानला एवढी केस वाढवायला जवळजवळ २ वर्षे लागली होती. असे ही माधुरीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले,मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही

Madhuri Dixit’s Son Ryan Donates Hair To Cancer Patients. “It Took Him Almost 2 Years To Grow The Required Length Of Hair,” She Writes

शिल्पा शेट्टी आणि फराह खाननेही केले रेयानचे कौतुक

रेयानच्या या निर्णयाचे बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खान यांनी त्याचे कौतुक केले आहे. शिल्पाने आपल्या टिपणीमध्ये लिहिले आहे की, हा चांगला विचार आहे. तर फराने रेयान हा किती सवेंदनशील आणि नम्र आहे असे टिपणीत म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी