28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमनोरंजनमाहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ

माहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आपल्या दुसऱ्या लग्नासाठी चर्चेत आहे. शाहरुखसोबत ‘रईस’ चित्रपटात काम केलेल्या माहिराने पाकिस्तान या आपल्या मूळ भूमीत बिझनेस मॅन सलीम करीमसोबत नुकतेच दुसरे लग्न केले. या दिमाखदार लग्नसोहळ्याच्या फोटोनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. आता माहिराने लग्नाआधीच्या विधीच्यावेळी परिधान केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती पिवळ्या साडीत चमकदार दिसत आहे. माहिराच्या सुंदर आणि सोज्वळ अदा पाहता तिच्या चाहत्यांनी फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

माहिरा खानने सलीम करीमसोबत कौटुंबिक खासगी सोहळ्यात लग्न केले होते. दहा दिवसांपूर्वी पाकिस्तानातील हिमालयीन पर्वत रांगांतील हिल स्टेशनवर हा सोहळा पार पडला. माहिरा खानने उद्योजक सलीम करीम यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्यापासून ती चर्चेत आली आहे. नुकताच तिने हळदी समारंभातील फोटो शेअर केले. ती पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्यांसह दिसत आहे. तिने तिच्या टीमसोबत कॅमेर्‍यासाठी पोझ देताना तिला. तिने फोटोंना कॅप्शन दिले, “माझ्या खादिजाने माझ्यासाठी ही साडी बनवली आहे… माझ्यासाठी रोज प्रार्थना करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)


तिने यापूर्वी २००७ साली अली अस्करीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर २०१५ साली दोघेही विभक्त झाले. माहिराला पहिल्या लग्नापासून अझलान नावाचा १३ वर्षांचा मुलगा आहे.

व्यावसायिक आघाडीवर, माहिरा अलीकडेच पाकिस्तानी ब्लॉकबस्टर ‘द लीजेंड ऑफ मौला जट’मध्ये अभिनेता फवाद खानसोबत दिसली होती. हे दोन्ही कलाकार आगामी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘जो बचाय हैं संग समत लो’ मध्ये एकत्र दिसणार आहेत, ज्यात अभिनेत्री सनम सईद देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)


‘रईस’ हा राहुल ढोलकिया दिग्दर्शित आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे निर्मित २०१७चा भारतीय हिंदी-भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. यात शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि माहिरा खान यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट 25 जानेवारी 2017 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनदिनी प्रदर्शित झाला. चित्रपट समीक्षकांकडून शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयाची, निर्मितीची रचना, सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक केले.

हे ही वाचा 

आमिरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, महाराष्ट्राची सून साकारणार मुख्य भूमिका

कोणी दिली प्रेमाची कबुली? अखेर परिणीती आणि राघवनं मौन सोडलं

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

‘रईस’ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. ‘रईस’२०१७ सालचा सर्वाधिक कमाई करणारा सहावा हिंदी चित्रपट ठरला. चित्रपटाच्या साउंडट्रॅकला युट्यूबवर १६० कोटीपेक्षा जास्त जणांनी पसंती दिली. ‘या’ चित्रपटाला ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये पाच नामांकन मिळाले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ४७ वा भारतीय चित्रपट ठरला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी