26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमनोरंजनमलायका अरोरा... आईच्या भूमिकेत

मलायका अरोरा… आईच्या भूमिकेत

मलायका अरोरा (Malaika Arora) हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड अँड ब्युटिफुल नाव (bold and beautiful) आहे. मलायका अरोराचा वावर असला की हवादेखील गरम होते. त्यामुळे इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तिच्या नव्या व्हिडीओ तसेच फोटोंची तिचे चाहते चातकासाठी वाट पाहत असतात. अशातच एका व्हिडीओत ती आईच्या भूमिकेत दिसली आहे. मॉडेलिंग करताना, तसेच हॉट फोटो शेअर करताना किंवा पार्टीतले फोटो शेअर करताना आपण मलायका अरोराला नेहमीच पाहतो. पण एव्हरग्रीन मॉडेल असलेल्या मलायकाने ती आईची भूमिकादेखील तेवढ्यात सशक्तपणे निभावत असल्याचा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.

तुम्हाला माहीत आहे का, मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे! विश्वास बसत नसेल तरीही काही दिवसांपूर्वीच तिनं तिचा ४८वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. अरबाज खान आणि मलायका विभक्त झाल्यानंतर तिची अर्जुन कपूरसोबत अगदी घट्ट मैत्री झाली आहे. मलायका आणि अरबाज खान यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव अरहान. अरहान (Arhaan) काल २१ वर्षांचा झाला. त्या निमित्तानं मलायकानं त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. मुलाला शुभेच्छा देताना मलायका आईच्या भूमिकेत (mothers role) शिरली. हेच तिचं वेगळेपण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अरहानला शुभेच्छा देताना मलायकानं त्याला जगण्याचा मंत्रही दिला आहे. कल्पना करता येईल असं सुंदर जीवन जग. आयुष्य भरभरून जग. प्रामाणिक राहा. आवडत असलेल्या लोकांसाठी आणि गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढ हे सांगतानाच नीट झोप आणि उत्तम स्वप्ने पाहण्याचाही सल्ला अरहानाच्या मातोश्री मलायकानं दिला आहे. तू मला खूप प्रिय आहेस.  वाढदिवसाच्या माझ्या गोड गोड मुलाला हार्दिक शुभेच्छा! आई तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते अन् आईला तुझा खूप अभिमान आहे, असंही मलायकानंही या शुभेच्छात नमूद केलं आहे.

हे ही वाचा

…अन् प्राजक्ता माळीला देव पावला!

‘मुंबईकरांना प्रदूषणमुक्त राहण्याचा अधिकार आहे की नाही’?

नवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

या व्हिडीओतून मलायकानं अरहानचे लहानपणापासूनेचे फोटो शेअर केले आहेत. आपण मलायका अरोराकडे नेहमी पार्टी गर्ल पाहतो. मात्र, तीदेखील एक आई आहे आणि आईचं काळीज नेहमी मुलासाठी धडधडत असतं, तिला मुलाची सतत काळजी वाटत असते. या व्हिडीओतून मलायका आईच्या भूमिकेत किती रमली आहे, हे स्पष्ट दिसतं. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनांही थक्क व्हायला झालं असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी