29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजनआता मराठी मनोरंजन उद्योगाची चर्चा परिषद!

आता मराठी मनोरंजन उद्योगाची चर्चा परिषद!

गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा, टेलिव्हिजन मालिका यात वेगवेगळ्या विषयांचे सादरीकरण होत आहे. वेगवेगळे कथानक, विषय यासह मराठी मनोरंजन क्षेत्रात आता वेबसिरीजचाही प्रवेश झाला आहे. मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटींची उड्डाणे घेत आहे. प्रेक्षकांचा कौल ओळखून निर्माते करत असलेल्या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत. निर्मात्यांना तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वांना योग्य मार्गदर्शन देत यात गुंतवणूक वाढावी यासाठी लायनगेज मीडियाच्या वतीने ‘मराठी एन्टरटेन्मेंट एक्स्पर्ट टॉक’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अशा पद्धतीच्या चर्चासत्राचे आयोजन पहिल्यांदाच केले जात आहे.

मराठी सिनेमा असो , टेलिव्हिजन असो किंवा वेबसीरीज या क्षेत्रातील आर्थिक आलेख झपाट्याने वाढत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्राचे अर्थकारण विस्तारत असताना गुंतवणूक फारशी वाढलेली नाही. अजूनही अनेक नवीन निर्मात्यांना मनोरंजनाचे हे गणित समजत नाही आहे.मनोरंजनाचे क्षेत्र आणि त्यात व्यवसाय करण्याची इच्छा असणारे अनेक निर्माते तंत्रज ,कलाकारांना मार्गदर्शनाची गरज भासते.

निर्मात्यांना इंडस्ट्रीची ओळख नसल्याने यशस्वी व्यावसायिकांची यादी अत्यंत ठराविक आहे. यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती लायनगेज मीडियाने दिली. मराठी मनोरंजनाच्या वर्तमान आणि भविष्यात त्याच्या वाढीबद्दल अनेक महत्वाची माहिती सांगितली जाईल. प्रत्येक मराठी सिनेमा 100 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही चर्चील्या जातील. आयटीसी हॉटेलमध्ये चर्चासत्र पार पडेल.

हे ही वाचा 

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

श्यामची आई’ लवकरच प्रदर्शित होणार !

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

मराठी मनोरंजन क्षेत्रात व्यवसायिकांनी, तंत्रज्ञानांनी कामाला सुरुवात करताना घ्यावयाची आवश्यक काळजी , कोणत्या योग्य व्यक्तीशी नेटवर्किंग करावे , मराठी वाहिन्या आणि मराठी स्टुडिओ यांच्याशी कनेक्ट कसे व्हावे अश्या अनेक गोष्टींवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. तज्ञांमध्ये विविध मनोरंजन वाहिनीचे प्रमुख, मुव्ही स्टुडिओचे प्रमुख,ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख आणि बॉलिवूडमधील काही महत्वाच्या व्यक्तीचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी